no images were found
अतितापामुळे बारावीची विद्यार्थिनी श्रावणी पाटील तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
कोल्हापूर : अतिताप आल्याने बारावीत शिकत असलेल्या श्रावणी अरुण पाटील, (वय 18, रा. दुसरा बस स्टॉप, फुलेवाडी, कोल्हापूर) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. श्रावणीच्या या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. ती शिवाजी पेठेतील महाविद्यालयात शिकत होती. श्रावणीची सध्या बारावीची परीक्षा सुरू होती. उर्वरित विषयांचा अभ्यास सुरु असतानाच चार दिवसांपूर्वी श्रावणीला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे उपचारासाठी फुलेवाडीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला रविवारी सकाळी घरी सोडण्यात आले.
मात्र, सोमवारी रात्री पुन्हा पुन्हा ताप आला. त्यानंतर सीपीआरमध्ये दाखल करण्यासाठी आणले जात असतानाच ती बेशुद्ध पडली आणि तिचा मृत्यू झाला. भावी आयुष्याची स्वप्ने पाहत असतानाच मुलीचा मृत्यू झाल्याने आईवडिलांनी एकच आक्रोश केला.