no images were found
अदाणी मुंद्रा विमानतळ आता सर्वसमावेशक मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स आणि व्यावसायिक केंद्र म्हणून उड्डाणासाठी सज्ज
अदाणी मुंद्रा विमानतळाची सुरुवात; वाहतूक, मालवाहतूक आणि व्यवसायासाठी आधुनिक केंद्र
- अदाणी मुंद्रा विमानतळाने स्टार एअरसोबत भागीदारी करत कच्छला मुंबई, बेंगळुरू, गोवा आणि सुरतसह आठ शहरांशी हवाई मार्गाने जोडले आहे.
- थेट विमानसेवेमुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून व्यापार, उद्योग, लॉजिस्टिक्स आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
- मुंद्रा आता पूर्णपणे एकात्मिक मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स आणि व्यावसायिक केंद्र म्हणून विकसित होणार आहे.
- मुंद्रा येथे आधुनिक विमानतळ उभारून अदाणी समूह आपल्या बंदर आणि विमानवाहतूक व्यवसायांमध्ये प्रभावी समन्वय निर्माण करत आहे.
मुंद्रा, : अदाणी मुंद्रा विमानतळाने मंगळवारी मुंबई आणि गोवा यांना जोडणाऱ्या आपल्या पहिल्या नियोजित विमानसेवेच्या शुभारंभाची घोषणा केली. स्टार एअरसोबतच्या धोरणात्मक भागीदारीत सुरू करण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण हवाई मार्ग कच्छ प्रदेशाच्या आर्थिक विकासाला नवी गती देणार असून, या भागाला एकात्मिक मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स आणि व्यावसायिक केंद्र म्हणून विकसित करण्यास मदत करणार आहे.
मंगळवारपासून अत्याधुनिक टर्मिनलमधून स्टार एअरच्या आठ नवीन विमानसेवा सुरू झाल्या असून, यामुळे एक जलद हवाई संपर्क मार्ग (एक्सप्रेस कॉरिडॉर) तयार होईल. या सेवांमुळे व्यापार, उद्योग, लॉजिस्टिक्स आणि पर्यटनासाठी लागणारा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, भारतातील सर्वात मोठे बंदर असलेल्या मुंद्राच्या आर्थिक प्रगतीला अधिक गती मिळेल. स्टार एअर मुंद्राला हिंडन, सुरत, बेळगाव, बेंगळुरू, कोल्हापूर, नांदेड, मुंबई आणि गोवा या शहरांशी जोडणार आहे.
अदाणी समूहाच्या यशस्वी विकास मॉडेलवर आधारित मुंद्रा विमानतळ हे कार्यक्षमता आणि भविष्यातील वाढ लक्षात घेऊन विकसित करण्यात आले आहे. 1,900 मीटर लांबीचा धावपट्टी मार्ग (रनवे) विविध प्रकारची प्रवासी आणि मालवाहतूक विमाने हाताळण्यास सक्षम आहे. तसेच आधुनिक टर्मिनलमध्ये प्रशस्त पार्किंग, अनेक चेक-इन काउंटर, आरामदायी लाउंज आणि सर्व सुविधा असलेले फूड कोर्ट उपलब्ध आहे. यामुळे या प्रदेशासाठी विकासाच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. विमानतळावर व्हीलचेअर सुविधा आणि प्रवाशांसाठी स्वतंत्र ड्रॉप-ऑफ झोनसह सुलभ आणि सोयीस्कर प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे
हा हवाई मार्ग सुरू करण्यामागील उद्देश भारतातील सर्वात मोठे खासगी बंदर असलेल्या मुंद्रा बंदराच्या आर्थिक विकासाला गती देणे हा आहे. तसेच, देशातील सर्वात मोठे अधिसूचित आणि कार्यरत बहुउत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र (मुंद्रा एसईझेड), जे भारताच्या आयात-निर्यात व्यवहारांचे महत्त्वाचे केंद्र आहे, त्याच्या वाढीसही या हवाई सेवेचा मोठा फायदा होणार आहे.
या हवाई जोडणीमुळे बंदरातून होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील व्यापारासाठी आवश्यक असलेली ‘लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी’ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मालवाहतूक अधिक कार्यक्षमपणे हाताळता येईल आणि राष्ट्रीय तसेच जागतिक पुरवठा साखळीशी अधिक प्रभावीपणे जोडता येईल.
हे आधुनिक विमानतळ अदाणी समूहाच्या बंदर आणि विमानवाहतूक व्यवसायांमध्ये मजबूत समन्वय निर्माण करण्यास मदत करणार आहे. तसेच, कच्छमधील व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी चालना देत, या प्रदेशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
या उपक्रमासाठी अदाणी समूहाने नवी मुंबई, मुंबई, अहमदाबाद, जयपूर, लखनौ, तिरुवनंतपुरम, मंगळुरू आणि गुवाहाटी येथील आठ जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या व्यवस्थापनातून मिळालेल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा उपयोग केला आहे.