no images were found
कापूस उत्पादक शेतक-यांसाठी खुशखबर! गोदरेज अग्रोव्हेट हिटवीड मॅक्सवर विशेष कॅशबॅक ऑफर
~ शेतक-यांना खात्रीशीर लाभ देत पिकांच्या सुरक्षिततेसाठी तण नियंत्रण व्यवस्थापन अंमलात आणण्यास प्रवृत्त करणे, हे या योजनेमागील प्रमुख उद्दिष्ट आहे. ~
मुंबई – देशात कृषी व अन्न क्षेत्रात अग्रगण्य कंपनी म्हणून नावाजलेल्या गोदरेज अग्रोव्हेट लिमिटेड कंपनीने कापूस उत्पादक शेतक-यांसाठी नवी घोषणा केली आहे. गोदरेज अग्रोव्हेट लिमिटेड कंपनीने कापूस उत्पादक शेतक-यांसाठी “हिटवीड मॅक्स’ या निवडक तणनाशकावर खास कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. कापूस पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच शेतक-यांनी प्रभावी तणव्यवस्थापन करावे, हा यामागील उद्देश आहे.
या योजनेंतर्गत हिटवीड मॅक्स खरेदी करणा-या शेतक-यांना खात्रीशीर कॅशबॅक बक्षीस स्वरुपात दिले जाईल. यामुळे शेतक-यांना थेट आर्थिक फायदा होईल. तसेच वैज्ञानिकदृष्ट्या शिफारस केलेल्या संरक्षण पद्धतींचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल. ही योजना अत्यंत सोपी आणि सुटसुटीत स्वरुपात तयार करण्यात आली आहे. शेतकरी या योजनेत सहजरित्या सहभाग नोंदवू शकतात. या योजनेचे बक्षीस थेट शेतक-यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
हिटवीड मॅक्स हे कापूस पिकासाठी उगवणीनंतर वापरायचे एक निवडक तणनाशक आहे. हे तणनाशक गवतवर्गीय आणि रुंद पानांच्या अशा दोन्ही प्रकारच्या तणांचा नाश करण्यासाठी प्रभावी ठरते. तण दुस-या किंवा तिस-या पानाच्या अवस्थेत विकसित झाल्यानंतर हे तणनाशक वापरण्याची शिफारस केली जाते. योग्य आणि प्रभावी पिकाच्या विकासाकरिता पाण्याच्या प्रति पंप ७० मिली या प्रमाणात औषध वापरण्याचा सल्ला दिला जातो. पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात वेळेवर तणनाशक फवारल्याने पीक आणि तण यांच्यातील स्पर्धा काहीशी कमी होते. यामुळे कापूस पिकाची सुयोग्यरित्या वाढ होते. परिणामी, उत्पादनात वाढ होते.
गोदरेज अग्रोव्हेट लिमिटेडच्या पीक काळजी व्यापाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजावेलू एन. के. म्हणाले, “कापूस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी योग्य वेळी प्रभावी तण व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असते. हिटवीड मॅक्सवरील कॅशबॅक ऑफरद्वारे शेतक-यांना उत्तम पर्यायासह आर्थिक प्रोत्साहन देणे, हा यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे शेतकरी शिफारस केलेल्या कृषी पद्धतींचा वेळेवर वापर करण्यास प्रोत्साहित होतील, या योजनेमुळे आधुनिक पीक संरक्षणाची सवय अंगी बाळगली जाईल. आर्थिक नुकसान टाळता येईल.”
शेतक-यांना दोन पर्यायांच्या माध्यमातून या योजनेत सहभागी होता येईल. त्याकरिता शेतकरी एकतर माहिती पत्रकावरील क्यूआर कोड स्कॅन करु शकतात किंवा प्रोमो कोड मिळवण्यासाठी दिलेल्या नंबरवर मिस कॉल देऊ शकतात. याशिवाय, हिटवीड मॅक्सचा आधीपासून वापर करणा-या शेतक-यांना हंगाम सुरु होण्यापूर्वीच मोबाईलवर पूर्व मंजूर प्रोमो कोडचे मेसेज पाठवले जातील. हिटवीड मॅक्सची खरेदी केल्यानंतर शेतक-यांनी उत्पादनाच्या बाटलीवर असलेला क्यूआर कोड स्कॅन करणे आवश्यक आहे. त्यानंतर सोपी आणि जलद पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतरच उपलब्ध कॅशबॅक ऑफर स्क्रीनवर दिसेल.
या उपक्रमाच्या माध्यमातून शेतक-यांमध्ये जनजागृती निर्माण करणे, याकरिता कंपनी प्रयत्नशील आहे. कंपनी आपल्या उत्पादनामागील उत्कृष्ट क्षमता आणि थेट आर्थिक लाभ यांची सांगड घालत या योजनेचा प्रसार करत आहे. शेतक-यांना तण व्यवस्थापनाच्या सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यास कंपनी लक्ष देईल. शेतकरी अत्याधुनिक पीक संरक्षण आणि शेतकरी-केंद्रित योजनांच्या मदतीने सक्षम बनण्यासाठी कंपनी कटिबद्ध राहील. यातून शेतीची उत्पादका आणि नफा वाढण्यास मदत होईल. शिवाय शेतक-यांचे उत्त्पन्न वाढल्याने एकूणच जीवनमानात सुधारणा घडेल, असा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला.