no images were found
एआय+ स्मार्टफोन्सकडून ‘प्रोजेक्ट ट्रस्ट+’ची घोषणा; सुरक्षा वाढीसाठी ₹१०० कोटींची गुंतवणूक
कोल्हापूर, : भारतीय स्मार्टफोन क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करण्याच्या उद्देशाने एआय+ स्मार्टफोन्सने ‘प्रोजेक्ट ट्रस्ट+’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. देशातील सर्वात सुरक्षित स्मार्टफोन इकोसिस्टम उभारण्यासाठी कंपनी पुढील पाच वर्षांत एकूण ₹१०० कोटी (दरवर्षी ₹२० कोटी) गुंतवणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत एथिकल हॅकर्स, सुरक्षा संशोधक आणि डेव्हलपर समुदायाला कंपनीच्या प्रणालींची चाचणी घेण्यासाठी, संभाव्य त्रुटी शोधण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्या दूर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पारंपरिक बग बाऊंटी कार्यक्रमांच्या पुढे जाऊन सामुदायिक सहभागातून अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह स्मार्टफोन अनुभव देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
या कार्यक्रमासाठी इच्छुक एथिकल हॅकर्स आणि सुरक्षा संशोधकांनी माधव सेठ यांच्या इन्स्टाग्राम बायोमधील लिंकद्वारे अर्ज करावा, असे कंपनीने आवाहन केले आहे