Home मनोरंजन सोनी सबवरील वागले की दुनियाला तीन वर्षे पूर्ण : अर्थपूर्ण कथांच्या माध्यमातून घडवले मन आणि हृदय

सोनी सबवरील वागले की दुनियाला तीन वर्षे पूर्ण : अर्थपूर्ण कथांच्या माध्यमातून घडवले मन आणि हृदय

8 second read
0
0
27

no images were found

सोनी सबवरील वागले की दुनियाला तीन वर्षे पूर्ण : अर्थपूर्ण कथांच्या माध्यमातून घडवले मन आणि हृदय

 

काळजाला हात घालणाऱ्या कथाकथनाची तीन यशस्वी वर्षे पूर्ण करत सोनी सबवरील ‘वागले की दुनिया : नई पिढी नये किस्से’ मालिकेने भारतीय दूरचित्रवाणीवर एक अमीट छाप टाकली आहे. केवळ मनोरंजनावरच न थांबता मालिकेने दैनंदिन सामाजिक समस्यांवर प्रकाशझोत टाकत त्यावर खुलेपणाने चर्चा करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. 

मालिकेचा एक अनोख पैलू म्हणजे, अनेक पिढ्यांच्या माध्यमातून केलेले चित्रण आहे. त्यात आजी-आजोबा श्रीनिवास वागले (अंजन श्रीवास्तव) आणि राधिका वागले (भारती आचरेकर), आई-वडील राजेश वागले (सुमीत राघवन) आणि वंदना वागले (परिवा प्रणती) तसेच तरुण आणि किशोरवयीन मुलं-मुली सखी (चिन्मयी सालवी) व अथर्व वागले (शाहीन कपाही) यांचा समावेश आहे. धावपळीच्या नाटकांपासून पूर्णपणे वेगळे होत वागले की दुनिया मालिका सर्वसामान्य मध्यमवर्गीय व्यक्तीच्या आयुष्याला भेडसावणाऱ्या दैनंदिन सामाजिक मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकते. गेल्या तीन वर्षांत वागले की दुनियाने प्रकाश टाकलेले काही प्रासंगिक सामाजिक विषयांवर टाकलेली ही एक नजर.

स्तनांच्या कर्करोगाबाबत जनजागृती 

वंदना यांना निदानाचा सामना करावा लागल्यानंतर वागले की दुनिया मालिकेने धैर्य दाखवत स्तनांच्या कर्करोगासारख्या संवेदनशील मुद्द्याला हात घातला. जबाबदारीपूर्वक कथाकथनासाठी कटिबद्ध असलेल्या या मालिकेने संवेदनशीलपणे अशा आजारांचे लवकर निदान होण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. मिथकांन दूर करत संकटांच्या काळात कौटुंबिक आधाराच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे सुंदरपणे चित्रण केले आहे. 

महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार 

एका फॅशन फोटोग्राफरद्वारे धाकटी कन्या सखीवर दुर्दैवी प्रकाराला सामोरे जाण्याची वेळ येते. तेव्हा एका सशक्त कथेअंतर्गत वागले की दुनिया मालिकेने छेडछाडसारख्या गंभीर मुद्द्यावर आवाज उंचावला. मालिकेने सखीचा प्रवास दाखवला आहे. तिच्यावर पडणाऱ्या मानसिक आघाताचा परिणाम अधोरेखित करण्यात आला आहे. मालिकेने वागले कुटुंबाचे तिला मिळालेले भरभक्कम पाठबळही दर्शवले. या आघातातून बाहेर पडण्यासाठी आणि तिच्या गुन्हेगाराविरुद्ध लढण्यासाठी कुटुंबीय निर्भय होऊन तिच्या बाजूने उभे राहिले होते. 

मासिक पाळीबाबतच्या निषिद्धतेवर मतप्रदर्शन

भारतीय घरांमधील एक सर्वसामान्य निषिद्ध गोष्टींच्याबाबत मत व्यक्त करून वागले की दुनिया मालिकेने प्रशंसा मिळवली. जेव्हा सखी मासिक पाळीबाबत तिच्या आजीच्या पारंपरिक विचारांवर प्रश्न उपस्थित करते तेव्हा ही मालिका एक विचारशील आणि हृदयस्पर्शी संदेश देते. यातून मासिक पाळीच्या विषयाचे सामान्यकरण आणि सामाजिकदृष्ट्या निषिद्ध गोष्टींविरुद्ध पुढाकार घेतला जातो.

बालमजुरीच्या समस्येची हाताळणी

वागले कुटुंबीयांनी बालमजुरीसारख्या संवेदनशील आणि त्रासदायक मुद्द्याचीही यशस्वीपणे हाताळणी केली आहे. त्यांच्या घरातील मोलकरीण जेव्हा तिच्या आठवर्षीय मुलीकडे एक बाळ सांभाळण्यासाठी देते तेव्हा बालमजुरीच्या समस्येकडे लक्ष वेधले जाते. बालमजुरी या मुलांचे आनंदी बालपण हिरावून घेते, हेही मालिकेत दाखवले आहे. आपल्या अवतीभोवती अशाच प्रकारची परिस्थिती अनुभवणाऱ्या लोकांना या मुद्द्यावर चिंतन करण्यास मालिकेने भाग पाडले आहे. ही स्थिती बदलण्यात योगदान देऊ शकणाऱ्या लोकांना सहजसोप्या पद्धतींवर विचार करण्यासाठी मालिकेने प्रोत्साहन दिले आहे. 

मानसिक आरोग्याचे संवेदीकरण

मानसिक आरोग्याच्या भोवतालीच्या लांच्छनाला तोडत मालिकेने एडीएचडीने ग्रस्त असलेल्या एका व्यक्तिरेखेचे संवेदनशीलपणे चित्रण केले आहे. या सामान्य विकाराबाबत समज आणि सहानुभूतीला प्रोत्साहन देत वागले की दुनिया मालिकेने कुठलीही शरम न बाळगता आपल्या संघर्षांबाबत मोकळेपणाने बोलण्यासाठी प्रेक्षकांना चालना दिली आहे. 

वागले की दुनिया मालिकेने आपला प्रवास कायम ठेवला आहे. सकारात्मक बदलांसाठी ही मालिका आजही सामर्थ्याशाली माध्यम म्हणून कायम आहे. ज्यात लोकांना जोडणे आणि समाजात महत्त्वपूर्ण संवाद सुरू करण्यासाठी भावनिक नाळ साधणाऱ्या कथाकथनाचा वापर केला जातो. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…