no images were found
युवासंसदेच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पारितोषिक स्विकारण्यासाठी संसदीय कार्यमंत्रालयाचे निमंत्रण
संसदिय कार्यमंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने नुकतेच शिवाजी विद्यापीठाच्या युवा संसदेचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांना 16 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमासाठी दि. 16 फेब्रुवारी, 2024 रोजी नवी दिल्ली येथे उपस्थित राहण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. शिवाजी विद्यापीठातील 55 विध्यार्थ्यांच्या संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ही स्पर्धा 23 मे 2023 रोजी पार पडली. या स्पर्धेत प्रश्न तास, विशेषाधिकाराचा भंग, कॉलिंग अटेंशन मोशन, वैधानिक कामकाज, विधेयक सादर करणे इ. संसदीय कार्यप्रणालीतील विषयामध्ये स्वच्छ भारत, कृषी, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्ष्मीकरण, नवीन शैक्षणिक धोरण, आर्थिक धोरण, संरक्षण इ. संदर्भाने युवा संसदेमध्ये अभ्यासपूर्ण चर्चा झाली. दिनांक 16 फेब्रुवारी, 2024 रोजी संसदिय कार्यमंत्रालयाचे राज्य मंत्री मा. अर्जुनलाल मेघवाल यांच्या अध्येक्षतेखाली
16 व्या राष्ट्रीय युवा संसदेच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संसदेच्या आवारातील बालयोगी समभागृहामध्ये होणार आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या युवासंसदेच्या संघाचा समुह स्तरावर पहिला नंबर आल्याबद्दल चषक मिळणार आहे. तसेच युवा संसदेचे समन्वयक डॉ.प्रल्हाद माने आणि आठ बक्षिस प्राप्त विध्यार्थ्यांना पारितोषिकाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये अनमोल पाटील, आसिया जमादर, श्रेया म्हापसेकर, पवन पाटील, साईसिमरन घाशी, प्रतीक्षा पाटील, रुतिका धनगर, प्रतिक्षा कांबळे या विद्याथ्र्यांचा समावेश आहे. याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. डी. टी शिर्के, प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि संचालक डॉ. पी. टी. गायकवाड यांनी युवासंसदेचे अभिनंदन केले.