
no images were found
आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात
पोलादपूर : शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम (शिंदे गटाचे जेष्ठ नेते रामदास कदम यांचा मुलगा) यांच्या गाडीला अपघात झाला.
या अपघातात सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप बचावले असून त्यांचा चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. आमदार योगेश कदम हे खेड कडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरची त्यांच्या गाडीला जबर धडक बसली. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला टँकर धडकल्याने गाडीचे बरेच नुकसान झाल्याचे दिसत आहे. सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप बचावले आहेत.