
no images were found
ज्येष्ठ नागरिकांना करात सूट
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्येष्ठ नागरिकांना २०२३ च्या अर्थसंकल्पापूर्वी नियमात बदल करून ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिलेला आहे. मोदी सरकारने ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून त्याची अद्ययावत करण्यात आले आहे. याबाबतची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली. अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून करण्यात आलेल्या ट्विटवरून :- ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ज्यांचे उत्पन्नाचे स्रोत म्हणून केवळ पेन्शन आणि बँकेचे व्याज आहे, त्यांना या सवलतीचा लाभ मिळेल. या सवलतीअंतर्गत त्यांना आता आयकर भरण्याची गरज भासणार नाही.
या सवलतीचा लाभ अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल की, ज्यांचे उत्पन्न पेन्शन किंवा व्याजदर आहे. यासाठी सरकारने आयकरात नवीन कलम समाविष्ट केले असून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आयकर सवलत देण्यासाठी, आयकर १९६१ च्या नियमांमध्ये सुधारणा करून कलम १९४-पी, नवीन कलम जोडण्यात आले आहे. बँकांनादेखील त्यांच्या नियमांमध्ये केलेल्या सुधारणांबाबत माहिती पुरविण्यात आली आहे. प्राप्तिकराच्या नियम ३१, नियम ३१ए, फॉर्म १६ आणि २४Q मध्ये देखील आवश्यक बदल करण्यात आले आहेत. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना आयकर विवरणपत्र भरण्याच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलेले आहे.
या करमुक्तीनंतर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आयकर विवरणपत्र भरणे अनिवार्य नाही. ज्या बँकेत त्यांचे खाते असेल, तीच बँक त्यांच्या उत्पन्नावर जो काही कर असेल तो कापून घेईल. आयकर रिटर्न भरण्यापासून सूट मिळवण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना १२ बीबीए फॉर्म भरावे लागतील आणि ते त्यांच्या बँकेत जमा करावे लागतील.