no images were found
गाभ चित्रपटाची टोरांटो, नेवाडा चित्रपट महोत्सवात निवड; कोल्हापूरच्या कलाकृतीचा गौरव
कोल्हापूर – वेगळे कथानक आणि आशय असणाऱ्या गाभ चित्रपटाची टोरांटो आणि नेवाडा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे.
टाईम लॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टिमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांची आहे. सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत.
‘गाभ’ चित्रपटात कैलास वाघमारे, विकास पाटील, सायली बांदकर, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत. छायाचित्रण वीरधवल पाटील यांचे तर संकलन रवींद्र चांदेकर यांचे आहे. गीते आणि संगीत आणि साउंड डिझाइन चंद्रशेखर जनवाडे तर जबाबदारी पार्श्वसंगीताची रवींद्र चांदेकर यांनी सांभाळली आहे. आनंद शिंदे, प्रसन्नजित कोसंबी, सावनी रवींद्र यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. रंगभूषा विजय ढेरे, वेशभूषा चैताली गाणू, केशभूषा रामेश्वरी, मोहिनी चव्हाण यांची आहे. व्हीएफक्स माधव चांदेकर तर कला दिग्दर्शनाची जबाबदारी सुंदर कुमार यांनी सांभाळली आहे. लाईन प्रोड्युसर चंद्रशेखर जनवाडे तर प्रोडक्शन मॅनेजर रंगराव पाटील आहेत.
दरम्यान, येथील स्थानिक कलाकृतीची निवड टोरांटो लिफ्ट ऑफ महोत्सवासाठी आणि नेवाडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी झाल्याने चित्रपटाच्या टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे.