no images were found
नितेश राणेंविरोधात आंदोलन करणाऱ्या तृतीयपंथीयांना फरफटत नेले
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तृतीयपंथी समूहाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. तृतीयपंथीयांविषयी केलेल्या आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी सत्ताधारी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तृतीयपंथीयांनी मंगळवारी रात्रीपासूनच आंदोलन छेडले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीतील काही कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पण, गुन्हा दाखल होत नसल्याने आक्रमक झालेल्या तृतीयपंथीयांनी बुधवारी बंडगार्डन चौकातील रस्त्यावर ठिय्या दिला. तुम्ही नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल का करत नाही, असा सवाल आंदोलक करत होते. मात्र, महिला पोलिसांनी त्यांना फरफटत बाजूला केले. त्यांना उचलून पोलीस ठाण्यात आणले. एक ते दीड तासानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
आंदोलनस्थळी पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी भेट दिली.
तृतीयपंथीयांचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी मुंबई शहर पोलिसांकडे पाठविणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.