Home Uncategorized दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र:  दृष्टीदिव्यांग विद्यार्थ्यांचा एम.ए. इतिहास अभ्यासक्रमास प्रवेश

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र:  दृष्टीदिव्यांग विद्यार्थ्यांचा एम.ए. इतिहास अभ्यासक्रमास प्रवेश

5 second read
0
0
3

no images were found

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र:  दृष्टीदिव्यांग विद्यार्थ्यांचा एम.ए. इतिहास अभ्यासक्रमास प्रवेश

कोल्हापूर : शिक्षणाची जिद्द आणि आत्मविश्वास यांचे प्रेरणादायी उदाहरण ठरत तीन दृष्टीदिव्यांग (अंध) विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात एम.ए. भाग-१ (इतिहास) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.

दृष्टिहीन असूनही उच्च शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा आणि चिकाटीच्या बळावर हणबरवाडी येथील अंध युवक मंच संचालित अंध मुला-मुलींचे निवासी वसतिगृह येथील पवन कागले, विकास पाईकराव तसेच पलूस (जि.सांगली) येथील अशोक चौगुले या विद्यार्थ्यांनी दूरशिक्षणाचा पर्याय स्वीकारला. अशोक चौगुले यांनी या अगोदर दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातून समाजशास्त्र व राज्यशास्त्र या विषयातून एम.ए.पदवी प्राप्त केली आहे. शिवाजी विद्यापीठाचे दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र हे सर्वसमावेशक शिक्षणाला प्राधान्य देत विविध घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देत आहे. या प्रवेशामुळे अंध विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे अधिक खुली होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन साहित्य, शैक्षणिक मार्गदर्शन, संपर्क सत्रे तसेच ऑनलाइन सुविधांच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. या प्रवेशामुळे इतर दिव्यांग  विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळणार असून, शिक्षण क्षेत्रात समावेशकतेचा संदेश अधिक दृढ होणार आहे.

       या विद्यार्थ्यांचे कुलसचिव डॉ.विलास शिंदे, संचालक डॉ.प्रतिभा पाटणकर, उपकुलसचिव विनय शिंदे, समन्वयक डॉ.कृष्णा पाटील, दिलीप मोहाडीकर, इतिहास विषयाचे डॉ.मुफिद मुजावर यांनी अभिनंदन केले.

विद्यापीठातील विविध अधिविभाग व प्रशासकीय विभागाच्या प्रवेशद्वारांवर दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीमधील नामफलक लावले आहेत. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात लावलेल्या ब्रेल लिपीमधील नामफलक वाचून या विद्यार्थ्यांनी प्रशासनास धन्यवाद दिले.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

विनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी महापालिकेची कारवाई; ६ दुकाने सील

विनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी महापालिकेची कारवाई; ६ दुकाने सील कोल्हापूर, : को…