
no images were found
भगवान महावीर अध्यासनाचा मोबाईल उपवास उपक्रम
भगवान महावीर अध्यासन शिवाजी विद्यापीठ मार्फत महावीर जयंती 2023 निमित्त अध्यासनाच्या सर्व विद्याथ्र्यांनी मोबाईल अपरिग्रह म्हणजे मोबाईल वापराचा कालावधी मर्यादीत ठेवण्याचा अभिनव उपक्रम पुढील भगवान महावीर जयंती पर्यंत साजरा केला जाणार आहे. या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षक आहारापूर्वी व आहारानंतर किमान 1-1 तास म्हणजे प्रती दिन किमान 2 तास मोबाईल बंद ठेवणार आहेत. मोबाईलचा वापर साधन म्हणून आवश्यक असला तरी त्यातून मोबाईलच्या आहारी जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. यासाठी आपल्या कुटुंबात मोबाईलचा सम्यक वापर केला जावा याकरिता हा मोबाईल उपवासाचा उपक्रम महत्वाचा ठरतो या उपक्रमाचे अभिनंदन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू मा. डॉ. पी एस पाटील, कुलसचिव मा. डॉ. व्ही एन शिंदे, वित्त व लेखा अधिकारी श्री अजित चौगुले यांनी केले आहे.