no images were found
फलटण तालुक्यातील कत्तलखान्यात ३० वासरांची कत्तल, ४२ जिवंत ताब्यात; दोघांवर गुन्हा दाखल
फलटण येथील मिरगाव येथे एका कत्तलखान्यात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एकुण ४२ जिवंत जर्शी गायीची वासरे व कत्तल केलेल्या ३० जर्शी गायीची वासरांचे मांस, पायाचे खोर, डोके, काढुन टाकलेली कातडी असा एकुण सहा लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.मिरगाव (ता. फलटण) येथे गायीची वासरे कत्तल करणेसाठी आणलेली आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी धाड टाकली.
पोल्ट्रीमध्ये असणारे लोकांना पोलिसांची चाहुल लागताचा ते अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. पोल्ट्रीमध्ये पोलीसांना अंदाजे २ दिवस ते ४० दिवस या वयोगटातील एकुण ४२ जर्शी गायीची वासरे कत्तल करण्यासाठीं आणलेली आढळून आली.तसेच अंदाजे ३० जर्शी गायीची वासरे कत्तल केलेल्या वासरांचे मांस, पायाचे खोर, डोके, काढुन टाकलेली कातडी तसेच पोल्ट्रीमध्ये सर्वत्र रक्त, पाणी पडलेले दिसत होते. तसेच जनावरे कापण्यासाठी हत्यारे दिसत होती. पोल्ट्रीच्या बाहेर एक तीन चाकी वाहन होते. त्यात वासरांची कत्तल केलेले मांस व मुंडकी दिसुन आली.
याप्रकरणी घटनास्थळावरुन पळून गेलेले शब्बीर शेख व सोपान शंकर सुळ यांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.