no images were found
राज्यात ‘डीएड’ कायमचं बंद होण्याची शक्यता
राज्यात प्राथमिक शिक्षकांसाठी असलेल्या डीएडचा अभ्यासक्रम आता कायमचा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना आता बारावीनंतर चार वर्षे बीएड करावे लागणार आहे
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेला डीएडचा अभ्यासक्रम कायमचं बंद होण्याची शक्यता आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्याऐवजी आता बारावीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना बीएड करावे लागणार आहेत. यासोबत त्यामध्ये स्पेशलायझेशन असणार आहे. केंद्राने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला मान्यता दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व अकृष विद्यापिठांमध्ये जून 2023-24 पासून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.