no images were found
मुरगुडमधील बोगस डॉक्टरविरुद्ध पोलिसांनीच दाखल केली फिर्याद
कोल्हापूर : कागल तालुक्यातील मुरगुडमध्ये बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित डॉ. दत्तात्रय शामराव कदम आणि काही अज्ञातांविरुद्ध अश्लील चाळे प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.मुरगूड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास बडवे हे या प्रकरणातील फिर्यादी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील निनावी पत्रे विविध माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बातम्या तसेच निनावी पत्रातून होत असलेल्या चित्रीकरणाची चर्चा, डॉ. कदमचे नग्न स्वरुपातील फोटोंच्या प्रसारित झालेल्या झेरॉक्स प्रती या पार्श्वभूमीवर योग्य तो तपास होण्यासाठी पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी फिर्याद दाखल केली आहे. अश्लील व्हिडीओ तयार करून चित्रफिती तसेच त्या चित्रफितींवरून छायाचित्रे बनवून त्याच्या झेरॉक्स प्रती काढून प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अश्लील चित्रफिती व्हायरल झाल्यानंतर शहरातील वातावरण गढूळ बनल्याने या प्रकरणाची शहर परिसरात चर्चा होती. यानंतर या प्रकरणाची महिला आयोगाकडून शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांना भेटून संशयिताला अटक करण्याची मागणी केली होती. संशयितांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, चित्रफित व्हायरल करणाऱ्यालाही ताब्यात घेऊन पोलिसांनी सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. त्यानंतर आता पोलिसांनी गंभीर दखल घेतली होती.