Home क्राईम माजी सरपंच पत्नीची पतीच्या वाढदिवसादिवशीच आत्महत्या

माजी सरपंच पत्नीची पतीच्या वाढदिवसादिवशीच आत्महत्या

2 second read
0
0
197

no images were found

माजी सरपंच पत्नीची पतीच्या वाढदिवसादिवशीच आत्महत्या

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये माजी सपंच पतीच्या वाढदिनीच माजी सरपंच पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात घडली.सुप्रिया बाजीराव वाडकर (वय 33. रा. हणबरवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सुप्रिया यांचे वडिल दिलीप शामराव पाटील (वय 59, रा. सैनिक टाकळी, ता. शिरोळ) यांनी इस्पूर्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मृत सुप्रिया यांचे पती बाजीराव वाडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत सुप्रिया यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

या प्रकरणी सुप्रिया यांचे वडिल दिलीप शामराव पाटील यांनी इस्पूर्ली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हंटले कि पती बाजीरावने 2012 पासून सुप्रिया यांना माहेरकडून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. यासाठी सातत्याने चारित्र्याचा संशय घेऊन मानसिक आणि शारिरीक त्रास दिला जात होता. त्यामुळे सातत्याने होणाऱ्या जाचाला कंटाळून हणबरवाडीमधील राहत्या घरी गळ्याला गळफास घेत आत्महत्या केली.

 

बाजीरावचा वाढदिवस होता. मुले शाळेल्या गेल्यानंतर सुप्रिया यांनी आपले पती बाजीराव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यानंतर बाजीराव हे काही कामानिमित्त बाहेरगावी निघून गेले. यानंतर घरी कोणी नसल्याची संधी साधून सुप्रिया यांनी आपल्या राहत्या घरी गळ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही महिला घरी गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांना तातडीने रुंग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या माहेरी याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर माहेरकडील आम्ही रुग्णालयात पोहोचल्याशिवाय मृतदेह ताब्यात घ्यायची नाही अशी भूमिका घेतली. ते आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. वडिल बाजीराव यांनी स्वत: इस्पूर्ली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …