
no images were found
झी सिने अॅवॉर्ड्स 2023’ने दाखवत आहे आपल्या उत्कंठावर्धक कलाकारांची झलक
झी सिने अॅवॉर्ड्स हा बॉलीवूडमधील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा टीव्ही, मीडिया आणि मनोरंजनाच्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड’ सादर करणार असून या पुरस्कारांद्वारे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीप्रमाणेच भव्य कामगिरी आणि गौरवशाली मनोरंजनही साजरे केले जाणार आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्याच्या पूर्वीच्या कार्यक्रमांनी परदेशांचाही दौरा केला असून गेल्या काही वर्षांत असंख्य नामवंत कलाकार, चित्रपट निर्माते आणि तंत्रज्ञांच्या प्रेरणादायक वाटचालीचाही गौरव केला आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात बॉलीवूडमधील उत्कृष्ट कलाकारांच्या या पुरस्कार सोहळ्याचे यजमानपद मुंबईला मिळाले आहे. या तारे-तारकांच्या सोहळ्यात जगभरातील नामवंत कलाकार, जागतिक मीडिया आणि ग्लिटझ-ग्लॅमरचा समावेश असेल. झी सिने पुरस्कार सोहळ्याचे प्रसारण झी सिनेमा, झी टीव्ही आणि झी-5 या वाहिन्यांवरून केले जाणार असल्याने जगभरातील चाहत्यांना या देशातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा पाहण्याची संधी मिळणार आहे.अतिशय दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या बॉलीवूडच्या या कार्यक्रमाची घोषणा बॉक्स ऑफिसची ‘डार्लिंग’ आलिया भट आणि शैलीदार रंगतदार व्यक्तिमत्त्वाचा ‘भेडिया’ वरूण धवन यांनी आज एका शानदार पत्रकार परिषदेत केली.
आलिया भट म्हणाली, “झी सिने पुरस्कार सोहळा हा असा कार्यक्रम आहे ज्याची चित्रपटसृष्टीशी संबंधित सर्वजण दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. 2023 मधील या पुरस्कार सोहळ्याची घोषणा करण्याचा मान मला मिळाल्याबद्दल माझा गौरव झाला आहे, असं मी मानते. स्टेजवर मी लाइव्ह नृत्य सादर केल्यास आता काही वर्षं लोटली आहेत. म्हणूनच यंदाचा हा पुरस्कार सोहळा माझ्यासाठी खूप खास आहे. 2022 हे वर्ष माझ्यासाठी अनेक अर्थांनी खूप महत्त्वपूर्ण राहिलं आहे. माझ्या सर्व हिट गाण्यांवर स्टेजवर नृत्य सादर करण्यास मी खूप उत्सुक बनले आहे. झी सिने पुरस्कार सोहळ्यात मला लाइव्ह नृत्य सादर करायचं आहे, या कल्पनेनेच मी थरारून गेले आहे. प्रेक्षकांना माझं हे अगदी खास नृत्य खूपच आवडेल, याची मला खात्री आहे!”वरूण धवन म्हणाला, “झी सिने अॅवॉर्ड्सच्या माझ्या अनेक वर्षांच्या अनेक स्मृती आहे – मग ते किआरासोबतचा परफॉर्मन्स असो किंवा बद्रीनाथ की दुल्हनिया आणि जुडवा 2 साठी मिळालेले पुरस्कार असोत, ह्या अॅवॉर्ड्स शोसाठी माझ्या हृदयात खास स्थान आहे. 2022 चे वर्ष खूपच छान होते आणि झी सिने अॅवॉर्ड्स 2023 मधील माझा अॅक्ट माझ्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.”
‘झी’चे मुख्य क्लस्टर अधिकारी तिवारी म्हणाले, “जगभरातील भारतीय प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा ‘झी’ने अलीकडेच 30 गौरवशाली वर्षांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. त्यामुळे यंदाच्या आमच्या वार्षिक भारतीय चित्रपट पुरस्कारांच्या सोहळ्याचं महत्त्व वेगळंच आहे. यंदा या कार्यक्रमातील मनोरंजनाचा स्तर आम्ही अगदी वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणार आहोत. त्यासाठी बॉलीवूडचे अनेक नामवंत स्टार त्यात सहभागी होणार असून आलिया भट आणि वरूण धवन यांच्या नावांची घोषणा झाली आहे. येत्या काही दिवसांतच व्यासपिठावर कार्यक्रम सादर करणार््या आणखी काही नामवंत कलाकारांची नावे आम्ही जाहीर करू. या कार्यक्रमाची उच्च वारसा, विश्वासार्हता आणि लोकप्रियता बघता, झी सिनेमा आणि झी टीव्ही या लोकप्रिय वाहिन्यांद्वारे एकाच वेळी जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत झी सिने पुरस्कार घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असेल. याशिवाय झी-5 या व्यासपिठावरूनही त्याचे प्रसारण केलं जाणार आहे. त्यामुळे आमच्या सर्व भागिदारांचा यात मोठा लाभ होणार आहे.” मारूती सुझुकी इंडियाच्या विपणन आणि विक्रीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी श्री.शशांक श्रीवास्तव म्हणाले, “हे सहकार्य भारताची सर्वांत मोठी ऑटोमोटिव्ह वाहिनी मारूती सुझुकी अरेना आणि बॉलीवूडमधील सर्वांत मोठ्या सेलिब्रेशन्सपैकी एक झी सिने अॅवॉर्ड्समधील नवीन आणि रोमांचक भागीदारीची सुरूवात आहे आणि यासह जादूई आणि झगमगत्या बॉलीवूडच्या दुनियेला साजरे केले जाईल. मोबिलिटीचा आनंद सर्वांना प्रदान करणे आणि रोमांचक नवीन अनुभव निर्माण करणे यामध्ये मारूती सुझुकीचा विश्वास आहे. आधुनिक, तंत्रज्ञानासह सक्षम आणि युवा अनुभवासह मारूती सुझुकी अरेना ह्या दृष्टीला वास्तवात उतरवत आहे.”