
no images were found
पुष्पा ने अद्वितीय दृष्टिकोनासह प्रेक्षकांची मने जिंकले.
मालिका ‘पुष्पा इम्पॉसिबल’ पुष्पाच्या गाथेला सादर करते, जिने तिचा उत्साही आनंद, आशावादी मानसिकता आणि जीवनाप्रती अद्वितीय दृष्टिकोनासह प्रेक्षकांची मने जिंकले आहे. मालिका रोमांचक अध्यायामध्ये प्रवेश करण्यास सज्ज आहे, जेथे प्रेक्षकांना हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. पुष्पाला तिचे कुटुंबिय व चाळीमधील सदस्य ती सामना करत असलेल्या समस्यांबाबत प्रश्नं विचारतात.
आतापर्यंतच्या कथानकामध्ये पाहायला मिळाले आहे की, मागील एपिसोड्समध्ये धरम रायधनची पत्नी वसुंधराच्या प्रवेशाने वसुंधरा व पुष्पा यांच्यात अनेक तणाव निर्माण केले आहेत. वसुंधरा पुष्पा व धरम ऊर्फ दिलीप यांचा घटस्फोट घडवून आणण्यामध्ये यशस्वी ठरण्यासह पुष्पाने देखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तिला वाटते की, दिलीपचा चॅप्टर आता संपला आहे. पण नशीबात काही वेगळ्याच योजना आहेत. नशीब पुष्पाला पुन्हा त्याच टप्प्यावर आणते, जेथे वसुंधरा त्याच्या अपघाताबाबतची दुर्दैवी बातमी सांगते आणि पुष्पाकडे मदत मागते. या सर्व घटनांमुळे राशी, अश्विन व दीप्तीच्या मनात अनेक संशय निर्माण होतात. अखेर त्यांना धक्कादायक सत्य समजते. पुष्पा दुविधेत अडकून जाते, जेथे तिला तिच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी एकाच वेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.