
no images were found
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सतर्फे नाविन्यपूर्ण बचत उत्पादन –आयसीआयसीआय प्रु गोल्ड लाँच
‘इमिजिएट इन्कम’ व्हेरिएंटमध्ये पॉलिसी वितरण झाल्यापासून ३० दिवसांत पूरक उत्पन्न दिले जाते.
‘इमिजिएट इन्कम विथ बुस्टर’ व्हेरिएंटमध्ये पॉलिसीच्या दर पाचव्या वर्षी अतिरिक्त खात्रीशीर उत्पन्न पुरवले जाते.
‘डिफरर्ड इन्कम’ व्हेरिएंटमुळे ग्राहकांना पॉलिसीच्या दुसऱ्या ते तेराव्या वर्षापर्यंत कधीही खात्रीशीर उत्पन्न मिळवते शक्य होते.
‘प्रीमियम ऑफसेट’ पर्यायामुळे बचत वॉलेटमध्ये जमा झालेल्या निधीतून भविष्यातील प्रीमियम भरता येतात.
मुंबई- आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने आयसीआयसीआय प्रु गोल्ड हे नाविन्यपूर्ण, दीर्घ काळ बचतीचे उत्पादन लाँच केले आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या उत्पन्नविषयक वैविध्यपूर्ण गरजा पुरवण्यासाठी अतिरिक्त उत्पन्न प्रवाह मिळवणे शक्य होते. आजीवन खात्रीशीर उत्पन्न देण्याबरोबरच या उत्पादनातील जीवन कवच कुटुंबाला आर्थिक सुरक्षाही मिळवून देते. ग्राहकांच्या उत्पन्नाविषयीच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे उत्पादन इमिजिएट इन्कम, इमिजिएट इन्कम विथ बुस्टर आणि डिफर्ड इन्कम अशा तीन प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.इमिजिएट इन्कम प्रकार निवडणाऱ्या ग्राहकांना पॉलिसी वितरित झाल्यानंतर ३० दिवसांत उत्पन्न मिळवण्याचा पर्याय निवडून आजीवन उत्पन्न मिळवण्याचा पूरक स्त्रोत लगेचच तयार करता येतो. इमिजिएट इन्कम विथ बुस्टर प्रकार निवडणाऱ्या ग्राहकांना आजीवन उत्पन्न मिळवण्याबरोबरच पॉलिसी वितरित झाल्यानंतर तीस दिवसांनी सुरू होणाऱ्या कालावधीच्या प्रत्येक पाचव्या वर्षी अतिरिक्त खात्रीशीर उत्पन्न मिळते.डिफर्ड इन्कम प्रकार
निवडणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या आर्थिक ध्येयानुसार उत्पन्न मिळवण्यास कधीपासून सुरुवात करायची हे ठरवता येते. ग्राहकांना पॉलिसीच्या दुसऱ्या वर्षापासून किंवा पॉलिसीच्या १३ व्या वर्षापासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करता येते. यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार उत्पन्न मिळवणे शक्य होते.या वैशिष्ट्यांबरोबर आयसीआयसीआय प्रु गोल्डद्वारे ग्राहकांना नियमित पेमेंटऐवजी त्यांच्या बचत वॉलेटमध्ये उत्पन्न जमा करण्याचा पर्याय मिळतो. ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजेनुसार बचत वॉलेटमध्ये जमा केलेली रक्कम अंशतः किंवा पूर्णपणे काढता येते. प्रीमियम ऑफसेट पर्यायामुळे ग्राहकांना जमा झालेल्या निधीतून भविष्यातील प्रीमियम्स भरता येतात.आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे प्रमुख वितरण अधिकारी श्री. अमित पाल्टा म्हणाले, ‘वाढत्या महागाईमुळे ग्राहकांना त्यांच्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाबरोबरच खात्रीशीर उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत तयार करता येतो. याच मुख्य उद्देशाने आयसीआयसीआय प्रु गोल्ड तयार करण्यात आले होते. हे नाविन्यपूर्ण दीर्घकालीन बचत उत्पादन ग्राहकांना महागाईपासून सुरक्षित ठेवत उत्पन्नाचा खात्रीशीर स्त्रोत उपलब्ध करून देते.’आयसीआयसीआय प्रु गोल्ड ग्राहकांना लिक्विडीटी मिळवून देण्यासाठी खास तयार करण्यात आले आहे. या उत्पादनाचे इमिजिएट इन्कम, इमिजिएट इन्कम विथ बुस्टर आणि डिफर्ड इन्कम हे तिन्ही प्रकार जीवन सुरक्षा कवचाबरोबरच खात्रीशीर, बोनस मिळवून देणारे नियमित उत्पन्न देते.आम्ही ‘प्रीमियम ऑफसेट’ हे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य लाँच केले आहे, जे ग्राहकांना बचत वॉलेटमध्ये जमा झालेला निधी भविष्यातील प्रीमियम भरण्यासाठी वापरण्याची मुभा देते. या दीर्घकालीन बचत उत्पादनाच्या मदतीने आम्ही ग्राहकांना अनिश्चिततेमुळे त्यांच्या आर्थिक बाजूवर परिणाम होण्याच्या चिंतेतून मुक्त करत उत्पन्नाच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे.