
no images were found
जागतिक कृषी आणि खाद्य उद्योगांमध्ये पाम ऑइलचे महत्त्वपूर्ण स्थान
पाम ऑइल हे पाम वृक्षाच्या फळापासून बनविलेले एक बहुउपयोगी आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे वनस्पती तेल आहे. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आणि वैविध्यपूर्ण वापरामुळे जागतिक कृषी आणि खाद्य उद्योगांमध्ये त्याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. 149 वर्षांपूर्वी 1875 साली पश्चिम आफ्रिकेत पाम वृक्षांची उत्पत्ती झाली, ती प्रामुख्याने दक्षिण-पूर्व आशियामध्ये सजावटीच्या उद्देशाने आणली गेली होती. सध्या, इंडोनेशिया आणि मलेशिया एकत्रितपणे जगातील पाम ऑइलच्या 85% पेक्षा जास्त ऑइलचा पुरवठा करतात. तथापि, हे उल्लेखनीय आहे की जगभरातील 42 पेक्षा जास्त देशांमध्ये पाम ऑइलची शेती केली जाते. या मोठ्या प्रमाणावर शेतीमुळे जगभरात पाम ऑइलच्या उत्पादनाचे जागतिक महत्त्व वाढले आहे.
डॉ. मीना मेहता, एक असोसिएट प्रोफेसर, जे सध्या डिपार्टमेंट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज अँड रिसर्च इन होम सायन्स आणि डिपार्टमेंट ऑफ फूड सायन्स अँड न्यूट्रिशन, एस.एन.डी.टी. वूमन युनिव्हर्सिटी मध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत त्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि म्हणाल्या. “पाम ऑईल ही निसर्गाने दिलेली एक बहुउपयोगी आणि शाश्वत देणगी आहे, जी जगाचे पोषण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. खाद्य उत्पादनातील त्याच्या अतुलनीय कार्यक्षमतेपासून ते आर्थिक वाढ आणि ग्रामीण विकासामध्ये योगदान देण्यापर्यंत माझा पाम ऑईलचे फायदे यावर विश्वास आहे. योग्य पद्धतींचा स्वीकार करून, आम्ही आमच्या सामर्थ्याचा उपयोग करू शकतो आणि सर्वांसाठी एक निरोगी, अधिक समृद्ध भविष्य घडवण्यासाठी तेल पामचा वापर करू शकतो.”
पाम ऑईलचा उपयोग सर्व उद्योगांमध्ये महत्वपूर्ण आहे. खाद्य क्षेत्रात, त्याच्या अद्वितीय संतुलित फॅटी ऍसिडच्या रचनेमुळे ते स्वयंपाकातील ऑईल, मार्जरीन आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ म्हणून वापरण्यास, तसेच उच्च तापमानात अन्न शिजवण्यासाठी योग्य आहे. याव्यतिरिक्त, साबण, शैम्पू आणि सौंदर्यप्रसाधने यांसारख्या वैयक्तिक वस्तूंमध्ये देखील पाम ऑइलचा समावेश केला जातो, जे त्याचा विविध उपयोग आणि कार्यक्षमता, स्थिरता आणि स्मूथ टेक्चर यासाठी महत्त्वपूर्ण आहे. एमपीओसी आणि मलेशियन पाम ऑईल बद्दल अधिक माहितीसाठी, mpoc.org.my ला भेट द्या.
मलेशियन पाम ऑइल उद्योग कठोर नियमांच्या चौकटीत कार्यरत आहे, ज्यामध्ये सध्या 15 हून अधिक कायदे आणि नियमांचा समावेश आहे. उद्योगाचा पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्याच्या उद्देशाने चालू असलेले प्रयत्न विविध पध्दती आणि तंत्रज्ञान लागू करण्यावर केंद्रित आहेत. या पद्धती पाम ऑइल लागवड, पाम ऑइल मिल्स आणि रिफायनरीजमध्ये यशस्वी झाल्या आहेत.
पौष्टिक गुणधर्म:
पाम ऑईल हे व्हिटॅमिन ई आणि प्रोविटामिन ए (विशेषतः बीटा-कॅरोटीन) सह आवश्यक पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहे. हे अँटिऑक्सिडंट्स चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत कारण ते शरीरातील मुक्त रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावांचा प्रतिकार करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. पाम ऑईलचे पौष्टिक गुणधर्म विविध खाद्यपदार्थांमध्ये त्याचा वापर करण्यास मदत करते, आहाराच्या गरजा पूर्ण करण्यास आणि संपूर्ण समाजाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते.