Home राजकीय पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता देवी जाधव आणि शिक्षक मतदार संघातून कौस्तुभ गावडे यांना मताधिक्य देणार -भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील

पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता देवी जाधव आणि शिक्षक मतदार संघातून कौस्तुभ गावडे यांना मताधिक्य देणार -भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील

1 second read
0
0
5

no images were found

पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता देवी जाधव आणि शिक्षक मतदार संघातून कौस्तुभ गावडे यांना मताधिक्य देणार -भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील

कोल्हापूर: पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉक्टर स्मिता देवी जाधव व शिक्षक मतदार संघातून कौस्तुभ गावडे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते जीवाचे रान करतील असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी व्यक्त केला .
भाजपच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत प्रचार यंत्रणा गतिमान करण्यासाठी मंडल अध्यक्ष व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत ते बोलत होते .
यावेळी बोलताना श्री नाथाजी पाटील म्हणाले ,पदवीधर निवडणुकीच्या मतदार नोंदणी मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नोंदणी केलेली आहे हे सगळे मतदार भारतीय जनता पार्टी शी संबंधित आणि त्यांच्याशी संलग्न आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजपच्या दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील .
यावेळी पदवीधर निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतदारांच्या संपर्कासाठी प्रमुख कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली .
यावेळी जिल्हा सरचिटणीस मेजर भिकाजी जाधव , महेश चौगुले, सुशीला पाटील,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रवीश पाटील कौलवकर, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष पांडुरंग वायदंडे,पदवीधर आघाडी प्रमुख अजित सिंह चव्हाण ,हंबीरराव पाटील , शिक्षक आघाडी प्रमुख नवनाथ पवार समाजभूषण लालासो पवार,जिल्हा चिटणीस अनिल देसाई, विकास पाटील अमित कांबळे सतीश पाटील (करवीर) मंदार परितकर (पन्हाळा )एकनाथ पाटील ॲड. अमर पाटील (कागल) स्वप्निल जरग संतोष कातिवले (राधानगरी ) संतोष पाटील भगवान शिंदे, अमोल पाटील,मोहन सूर्यवंशी ( भुदरगड ) प्रीतम कापसे ( गडहिंग्लज ) यांचेसह कोल्हापूर ग्रामीण जिल्हयातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थीत होते .

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे २३ संशोधक

जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे २३ संशोधक प्र-कुलगुरू डॉ. ज्योती …