Home मनोरंजन स्वरूप सावंत  दिग्दर्शित ‘पॉस्को ३०७’१६ मे पासून सिनेमागृहात

स्वरूप सावंत  दिग्दर्शित ‘पॉस्को ३०७’१६ मे पासून सिनेमागृहात

12 second read
0
0
14

no images were found

स्वरूप सावंत  दिग्दर्शित ‘पॉस्को ३०७’१६ मे पासून सिनेमागृहात

 

     २०१२ साली आलेल्या पॉस्को ३०७ या माहीत नसलेल्या कायद्याबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू असलेली पाहायला मिळतेय. हो, कारण काही दिवसांपासून पॉस्को ३०७ या कायद्यावर आधारित नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं समोर आलं आणि तेव्हापासून हा कायदा नेमका काय आहे हे जाणून घेण्याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली पाहायला मिळाली. या चित्रपटाच्या टिझरने तर ही उत्सुकता वाढवली मात्र आता या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच ताणताना दिसतोय. लैंगिक अत्याचार, बलात्कार या सगळ्याला आळा घालायला हा नवा कोरा चित्रपट येत्या १६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

     ‘पोस्को ३०७’ हा कायदा साऱ्यांपासून वंचित राहिला आहे. हा कायदा गुन्हेगाराला नक्की कोणती शिक्षा मिळवून देणार त्यांनी केलेला लैंगिक अत्याचार, बलात्कार याला योग्य ती शिक्षा मिळवून देणार का?, हे विषय चित्रपटाच्या ट्रेलर मधून स्पष्ट दिसत आहेत. उत्तम संवाद, जबरदस्त डायलॉग आणि ॲक्शनचा भरणा असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने साऱ्यांच लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमध्ये पाहता कलाकारांचा अभिनय हा मोठा पडद्यावर पाहणं फारच रंजक ठरणार आहे. ट्रेलरवरून असे समजते की एका नाजूक अशा विषयाला उत्तमरीत्या सांभाळत या चित्रपटाने ‘पॉस्को ३०७’ या कायद्याची जाणीव साऱ्यांना करून दिली आहे.

     महाभारतातील अनेक घटनांचा आधार घेत या चित्रपटाची बांधणी केली असल्याचंही ट्रेलरच्या संवादावरून स्पष्ट होत आहे. ‘सिया एंटरटेनमेंट’ आणि कौशिक मेहता प्रस्तुत आणि वैशाली बाळासाहेब सावंत व प्रेमलताचंपक संघवी निर्मित ‘पॉस्को ३०७’ चित्रपट आहे. स्वरूप सावंत दिग्दर्शित हा चित्रपट असून त्यानं या चित्रपटाच्या कथेची आणि पटकथेची जबाबदारी ही उत्तमरीत्या पेलवली आहे. विशाल सुदाम जाधव, केशव कल्याणकर यांनी चित्रपटाच्या पटकथा आणि संवादाची धुरा सांभाळली आहे. तर सोपान पुरंदरे यांनी हा चित्रपट त्यांच्या कॅमेरात कैद केलाय. या चित्रपटाला प्रथमेश कानडे याने संगीत दिलं असून संकलक म्हणूनही स्वरूप सावंत याने बाजू सांभाळली आहे. जबरदस्त डायलॉग आणि एक्शन सीनचा भरणा असलेला हा पॉस्को ३०७ हा चित्रपट १६ मेपासून चित्रपटगृहात पाहायला विसरू नका.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अदानी समूहाने खनिज वाहतुकीसाठी भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक केला तैनात

अदानी समूहाने खनिज वाहतुकीसाठी भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक केला तैनात • अदानी …