Home सामाजिक एचडीएफसी बँकेचा ग्लोबल प्रायव्‍हेट बँकिंग अवॉर्डस् २०२४ येथे ‘बेस्‍ट प्रायव्‍हेट बँक इन इंडिया’ पुरस्‍कारासह सन्‍मान 

एचडीएफसी बँकेचा ग्लोबल प्रायव्‍हेट बँकिंग अवॉर्डस् २०२४ येथे ‘बेस्‍ट प्रायव्‍हेट बँक इन इंडिया’ पुरस्‍कारासह सन्‍मान 

3 min read
0
0
51

no images were found

एचडीएफसी बँकेचा ग्लोबल प्रायव्‍हेट बँकिंग अवॉर्डस् २०२४ येथे बेस्‍ट प्रायव्‍हेट बँक इन इंडिया’ पुरस्‍कारासह सन्‍मान 

 

मुंबई एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्‍या खाजगी क्षेत्र बँकेचा प्रोफेशनल वेल्‍थ मॅनेंजमेंट (पीडब्‍ल्‍यूएम) द्वारे आयोजित करण्‍यात आलेल्‍या ग्लोबल प्रायव्‍हेट बँकिंग अवॉर्डस् २०२४ येथे बेस्‍ट प्रायव्‍हेट बँक इन इंडिया’ पुरस्‍कारासह सन्‍मान करण्‍यात आला.  

आघाडीचे जागतिक व्‍यवसाय प्रकाशन फायनान्शियल टाइम्‍सद्वारे प्रकाशित प्रोफेशनल वेल्‍थ मॅनेजमेंट (पीडब्‍ल्‍यूएम) खाजगी बँका आणि ते कार्यरत असलेल्‍या प्रादेशिक आर्थिक केंद्रांच्‍या विकास धोरणांचे विश्‍लेषण करण्‍यामध्‍ये विशेषीकृत आहे. ग्‍लोबल प्रायव्‍हेट बँकिंग अवॉर्डसने स्‍वत:ला जगातील सर्वात प्रतिष्ठित प्रायव्‍हेट बँकिंग अवॉर्डस् म्‍हणून स्‍थापित केले आहे आणि आता आपल्‍या सोळाव्‍या वर्षाला साजरे करत आहे. 

पीडब्‍ल्‍यूएमने आपल्‍या वेबसाइटवर सांगितले“भारतातील सर्वात मोठ्या खाजगी मालकीच्‍या बँकेचा भाग असलेले एचडीएफसी प्रायव्‍हेट बँकिंग आता देशामध्‍ये गती निर्माण करत आहेजेथे मालमत्ता झपाट्याने वाढत आहे.आणि मालमत्तेमधील या मोठ्या वाढीमध्‍ये अग्रस्‍थानी राहण्‍यासाठी हब-अँड-स्‍पोक’ व्‍यवसाय मॉडेलची निर्मितीतसेच बँकेच्‍या कर्मचारीवर्गामध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ करणे महत्त्वाचे आहेअसे एचडीएफसी बँकेच्‍या इन्‍व्‍हेस्‍टमेंट बँकिंगप्रायव्‍हेट बँकिंगइंटरनॅशनल बँकिंगडिजिटल इकोसिस्‍टम्‍स आणि बँकिंग अॅज ए सर्विस (बीएएएस)चे ग्रुप हेड श्री. राकेश के. सिंग म्‍हणाले.’’ 

 राकेश के. सिंग म्‍हणाले“आम्‍हाला प्रोफेशनल वेल्थ मॅनेजमेंट (पीडब्‍ल्‍यूएम) यांच्‍या हस्‍ते या पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आल्‍याने सन्‍माननीय वाटत आहे. या पुरस्‍कारामधून ग्राहकांना सेवा देण्‍याची आमच्‍या टीमची समर्पितता आणि जवळपास तीन दशकांपासून त्‍यांनी एचडीएफसी बँकेवर दाखवलेला विश्‍वास दिसून येतो. एचडीएफसी बँक ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनावर प्रबळ भर देते आणि मालमत्तावर्गांमध्‍ये सर्वोत्तम आर्थिक सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. ग्राहक अनुभव वाढवण्‍यासाठी आम्‍ही फिजिटल दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित केले आहे. आमचे मालमत्ता व्‍यवस्‍थापक भारतभरातील ९२३ ठिकाणांमधील ग्राहकाच्‍या गरजांची पूर्तता करतात. आम्‍ही आमचे अॅप्‍लीकेशन – स्‍मार्टवेल्‍थच्‍या माध्‍यमातून मालमत्ता व्‍यवस्‍थापनासाठी तंत्रज्ञानाचा फायदा घेतो. हे अॅप्‍लीकेशन कुठेही व कधीही मालमत्ता व्‍यवस्‍थापन व्‍यवहारअपडेट्स व रिपोर्टसची सुविधा देते. आम्‍ही आमचे टॅलेंट व त्‍यांच्‍या विकासामध्‍ये सतत गुंतवणूक करत राहण्‍याप्रती कटिबद्ध आहोततसेच आमचा विश्‍वास आहे की, आमच्‍या टीम्‍स आमच्‍या मोठ्या मालमत्ता आहेत.’’ 

अडीच दशकांहून अधिक काळाचा अनुभव असलेली एचडीएफसी बँक वेल्‍थ देशातील सर्वात मोठी मालमत्ता वितरक आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्‍ये मालमत्ता व्‍यवसायाने गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत ग्राहकवर्गामध्‍ये ३४ टक्‍के वाढीची नोंद केली. हा व्‍यवसाय ८३,००० हून अधिक कुटुंबांचे व्‍यवस्‍थापन पाहतो. एचडीएफसी बँकेची हब अँड स्‍पोक मॉडेलच्‍या माध्‍यमातून ९२३ ठिकाणी कार्यरत १,००० वेल्‍थ बँकर्सची टीम आहेतसेच व्‍यवस्‍थापनांतर्गत मालमत्ता (एयूएम) ६.३४ लाख कोटी रूपये आहे. आर्थिक वर्ष २४ मध्‍ये एयूएममध्‍ये ४३ टक्‍के वाढ झाली. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…