Home मनोरंजन ऐश्वर्या खरेने घातला 20 किलो वजनाचा लेहेंगा

ऐश्वर्या खरेने घातला 20 किलो वजनाचा लेहेंगा

5 second read
0
0
29

no images were found

ऐश्वर्या खरेने घातला 20 किलो वजनाचा लेहेंगा

प्रसारणास प्रारंभ झाल्यापासूनच ‘झी टीव्ही’वरील ‘भाग्यलक्ष्मी’ ही मालिका नेहमीच चांगल्या कारणांसाठी चर्चेत राहिली आहे. मालिकेतील ऐश्वर्या खरे आणि रोहित सुचांती या प्रमुख कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले असून #RishMi  ही नावे आता घरोघरी पोहोचली आहेत. अलीकडच्या भागांमध्येही रिषीला हे कळते की विक्रांतचे (मोहित मल्होत्रा) सलोनी (श्रध्दा जयस्वाल) नावाच्या मुलीशी आधीच लग्न झाले आहे, हे पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता लक्ष्मीचे लग्न विक्रांतशी होणार असल्यामुळे आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना अनेक नाट्यपूर्ण घडामोडी पाहायला मिळतील.

कथानकातील या नाट्यामुळे जसे प्रेक्षकांचे लक्ष मालिकेकडे लागले आहे, तसेच लक्ष्मी ऊर्फ ऐश्वर्या खरेने नववधूच्या परिधान केलेल्या देखण्या पोशाखामुळेही प्रेक्षक टीव्हीला डोळे लावून बसले आहेत. सोनेरी आणि लाल रंगाचा लेहेंगा, त्याला शोभेलसा हार, भांगात घातलेला टिक्का आणि नाकातील नथीमुळे ऐश्वर्या खरे अतिशय सुरेख दिसत होती. पण अशा सुंदर पोशाखाबरोबर काही आव्हानेही कलाकारांपुढे येतात, हे प्रेक्षकांना ठाऊक नसते. कथानकातील लग्नाच्या कथाभागासाठी ऐश्वर्याने परिधान केलेल्या या लेहेंग्याचे वजन तब्बल 20 किलो होते! पण या लेहेंग्यात ऐश्वर्याचे सौंदर्य केवळ अधिकच खुलून दिसले, असे नव्हे तर तिने इतका वजनदार लेहेंगा परिधान करूनही आपले संवाद अचूक म्हटले आणि मुंबईच्या भर पावसातही ती सेटवर तसेच आऊटडोअर चित्रीकरणासाठी ती या लेहेंग्यात सफाईदार वावरली.

ऐश्वर्या खरे म्हणाली, “नववधूचा पोशाख घालायचा म्हटलं की मी नेहमीच आनंदात असते. यावेळीही मला या प्रसंगात नववधू म्हणून उठून दिसायचं होतं. त्यामुळे जेव्हा माझ्या वधूच्या लूकची चर्चा सुरू होती, तेव्हा मीसुध्दा आमच्या टीमला आणि माझ्या स्टायलिस्टला माझ्या सूचना दिल्या. त्यांनीही माझ्या काही सूचनांचा माझ्या लूकमध्ये समावेश केला. शेवटी माझा लूक जसा दिसला आहे, ते पाहून मी खूपच सुखावले. 

ऐश्वर्या वजनदार लेहेंगा आणि दागिने अंगावर वागवूनही सहजतेने वावरली असली आणि तिने चित्रीकरण केले असले, तरी तिचे विक्रांतशी होणारे लग्न रिषी थांबवू शकतो का आणि विक्रांतचे खरे रूप सर्व कुटुंबियांसमोर उघड करू शकतो का, ते पाहणे निश्चितच रंजक ठरेल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…