
no images were found
गीतांजली मिश्राबाबत कामना पाठक ची प्रतिक्रिया
भारतीय टेलिव्हिजन बहुतांश घरांमध्ये मनोरंजनाचे स्रोत बनले आहे. भारतीय टेलिव्हिजनवर अनेक लक्षेवधक व उत्साही पात्रं पाहायला मिळतात, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. असेच एक लोकप्रिय पात्र आहे एण्ड टीव्हीवरील घरेलू कॉमेडी ‘हप्पू की उलटन पलटन’मधील राजेश सिंग. आणि आता प्रेक्षकांना प्रसिद्ध अभिनेत्री गीतांजली मिश्रा मालिकेमध्ये राजेशची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.
अप्रतिम अभिनय कौशल्ये आणि टेलिव्हिजन व वेब सिरीजमधील प्रभावी परफॉर्मन्ससाठी लोकप्रिय गीतांजलीला मालिकेमधील तिच्या प्रवेशाची घोषणा केल्यापासून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चार वर्षांपासून ही प्रेमळ भूमिका साकारलेली अभिनेत्री कामना पाठकने खुल्या मनाने गीतांजलीचे स्वागत केले. या दोन प्रतिभावान अभिनेत्रींमधील संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये नवीन राजेश बनण्याबाबत गीतांजली मिश्राच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टला प्रतिक्रिया देत कामना पाठक म्हणाल्या, ”गीतांजलीचे अभिनंदन! तुला खूप खूप प्रेम. रज्जो माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. ही भूमिका माझ्यामध्ये सामावलेली आहे. मला या भूमिकेसाठी खूप प्रेम मिळाले आहे आणि मला खात्री आहे की, तू देखील या भूमिकेला न्याय देशील. मी त्यासाठी आधीच तुझे अभिनंदन करते.