Home औद्योगिक फ्लिपकार्टकडून रणवीर ब्रार, पूजा धिंग्रा आणि ख्यातनाम ब्रँड्सच्या अनावरणांसह फूड फेस्ट २.० मध्ये गॉरमेट फूड डिस्कव्हरीचा उत्सव

फ्लिपकार्टकडून रणवीर ब्रार, पूजा धिंग्रा आणि ख्यातनाम ब्रँड्सच्या अनावरणांसह फूड फेस्ट २.० मध्ये गॉरमेट फूड डिस्कव्हरीचा उत्सव

42 second read
0
0
36

no images were found

फ्लिपकार्टकडून रणवीर ब्रार, पूजा धिंग्रा आणि ख्यातनाम ब्रँड्सच्या अनावरणांसह फूड फेस्ट २.० मध्ये गॉरमेट फूड डिस्कव्हरीचा उत्सव

 

 *या महोत्सवात प्रचंड गर्दी दिसून आली. या वेळी २५,००० हून अधिक लोकांनी उपस्थिती दर्शविली४०+ एंगेजमेंट झोन आणि १०० दशलक्षाहून अधिक ऑनलाइन इंप्रेशन्स मिळाले.

*शुगर फ्रीडाबररिअलहॅपिलोसॅफोलाट्रू एलिमेंट्सन्यूट्रालाईट आणि इतर अनेक ब्रँड्सनी नवीन अनावरणे आणि सिग्नेचर उत्पादने प्रदर्शित केली.

 

बंगळुरू  भारतातील देशांतर्गत ई-वाणिज्य बाजारपेठ असलेल्या फ्लिपकार्टने फूड फेस्ट २०२५ च्या दुसऱ्या आवृत्तीचे यशस्वीरित्या आयोजन केले. हा भारताच्या विकसित होत असलेल्या खाद्य संस्कृतीचा एक अद्वितीय उत्सव आहे. या कार्यक्रमाचे आयोजन  ८ आणि ९ जुलै रोजी बेंगळुरूमधील फ्लिपकार्ट कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आले होते. हा महोत्सव ५ जुलै ते १० जुलैदरम्यान क्युरेटेड सेलद्वारे ऑनलाइन विस्तारित करण्यात आला. त्यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट ब्रँड्समधील गोरमेट फूड कलेक्शन, नवीन उत्पादने आणि मर्यादित काळासाठी ऑफर्सची सुविधा मिळाली. या कार्यक्रमाने देशभरातील प्रसिद्ध शेफ, सर्वोत्तम क्रिएटर्स, ख्यातनाम ब्रँड आणि खाद्यप्रेमींना एकत्र आणले. त्यामुळे भारतातील गोरमेट फूड डिस्कव्हरी आणि कॉमर्सचे भविष्य घडवण्याच्या फ्लिपकार्टच्या वचनबद्धतेची खात्री झाली.

फ्लिपकार्ट फूड फेस्ट २.० मध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी झाली. या वेळी २५,००० हून अधिक लोकांनी भेट दिली, ४०+ एंगेजमेंट झोन, १० ब्रँड लाँच, ३०+ ब्रँड शोकेस, १०० दशलक्षाहून अधिक ऑनलाइन इंप्रेशन आणि भेटी आणि इन्फ्लुएन्सर्स आणि उपस्थितांनी तयार केलेल्या १००० हून अधिक मूळ कंटेंटचाही समावेश होता. गॉरमेट फूड डिस्कव्हरी आणि ब्रँड व्हिजबिलिटीवर आधारित या फेस्टमध्ये शुगर फ्री, डाबर, हॅपिलो, सफोला आणि इतर ब्रँड्सच्या नवीन लाँचचा समावेश होता. इमर्सिव्ह ब्रँड एक्सपिरियन्स आणि कंटेंटवर आधारित अ‍ॅक्टिव्हेशन्सनी फ्लिपकार्टच्या वेगाने वाढणाऱ्या अन्न आणि पेय श्रेणीला अधोरेखित केले आणि गॉरमेट फूड डिस्कव्हरीसाठी एक प्रमुख ठिकाण म्हणून स्थान ठरले.

आकर्षक फूड स्टॉल्स आणि गॉरमेट टेस्टिंगपासून ते क्रिएटर संभाषणांपर्यंत ऑन-ग्राउंड अनुभव ब्रँडशी संवाद साधण्यासाठी तयार करण्यात आला होता. कॉकटेल कंपनीचा मिक्सोलॉजी मास्टरक्लास, द परफेक्ट कॉफी ब्रूइंग सेशन आणि हाय-एनर्जी फ्लिपकार्ट मास्टरशेफ चॅलेंज यासारख्या संवादी सत्रांमुळे उपस्थितांना प्रत्यक्ष अनुभव घेता आला. तसेच उदयोन्मुख फूड ट्रेंड्स आणि ब्रँड कथांशी थेट धमाल आणि परस्परसंवादी चर्चा करता आली.

या अनुभवाचे केंद्रबिंदू प्रसिद्ध शेफ पूजा धिंग्रा आणि रणवीर ब्रार होते. त्यांनी मास्टरशेफच्या लाईव्ह पाककृती वर्गाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शेफ पूजा धिंग्रा यांनी इच्छुक होम बेकरना सुलभ तंत्रांसह आधुनिक भारतीय खाद्यपदार्थ सादर केले. शेफ रणवीर ब्रार यांनी आपल्या स्वयंपाक सत्राद्वारे समकालीन दृष्टिकोनातून पुनर्संकल्पना केलेल्या प्रादेशिक चवींचे प्रात्यक्षिक सादर केले. प्रशंसित विनोदी कलाकार राहुल सुब्रमण्यम यांनी स्टँड-अप कॉमेडीद्वारे त्यांची कला स्टेजवर आणली, तर म्युझिक बँड रोझमेरी अँड द हर्ब्सने अॅम्फीथिएटरमध्ये ऊर्जा आणणाऱ्या धमाल सादरीकरणाने उत्सवाची चमक वाढवली. भारतातील आघाडीचे फूड इन्फ्लुएंसर या उत्सवात सामील झाले. त्यांनी सोशल प्लॅटफॉर्मवर त्यांचे अनोखे अनुभव शेअर करून आपल्या पाककृती प्रवासावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध टेलिव्हिजन व्यक्तिमत्व आणि पाककलाप्रेमी मारिया गोरेट्टी यांनी केले होते. त्यांनी भारतीय अन्न आणि आरोग्य ग्राहकांना निर्माते आणि ब्रँड नेतृत्वांसह नवीन युगातील ब्रँड्सवर लक्ष केंद्रित करणाऱ्या चर्चासत्राचे नेतृत्व केले. या चर्चासत्रातून अन्न आणि सकस आहारातील प्रमुख व्यक्ती एकत्र आल्या आणि त्यांनी ग्राहकांच्या बदलत्या पसंती, स्वच्छ-लेबल ट्रेंड आणि डी२सी संधींबद्दल मौल्यवान मत सादर केले.

फ्लिपकार्टचे ग्राहकोपयोगी वस्तू (सौंदर्यएफएमसीजी आणि आरोग्यसेवा) विभागाचे वरिष्ठ संचालक निशांत दलाल म्हणाले, “फूड फेस्ट २०२५ मधून आम्ही केवळ अन्न पदार्थ साजरे करत नाही आहोततर आम्ही गोरमेट फूड शोधकथाकथन आणि समुदाय-नेतृत्वाखालील व्यापाराचे एक नवीन युग निर्माण करत आहोत. फ्लिपकार्टला प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणाआनंद किंवा नावीन्याच्या शोधासाठी एक उत्तम ठिकाण बनवण्याचे आमचे ध्येय आहे. या फेस्टने निर्मातेशेफसेलिब्रिटीब्रँड आणि ग्राहकांना चव आणि तंत्रज्ञानाच्या उत्सवात एकत्र आणले. फ्लिपकार्ट तंत्रज्ञानमनोरंजन आणि जीवनशैलीचे मिश्रण करून ई-कॉमर्सची पुनर्कल्पना करत असतानाआम्ही आमच्या भागीदारांसाठी ग्राहक सहभागश्रेणी नवसंशोधने आणि शाश्वत वाढ यांना चालना देणारे प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

हॅप्पिलोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विकास नाहर म्हणाले की, फूड फेस्ट २०२५ साठी फ्लिपकार्टसोबत भागीदारी केल्याने आम्हाला आमच्या कलाकृतींचे प्रदर्शन एका उत्साहीग्राहककेंद्री परिसंस्थेत करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाची व्याप्तीविचारपूर्वक तयार केलेले विभाग आणि प्रेक्षकांची ऊर्जा यामुळे हा ब्रँडसाठी महत्त्वाचा उपक्रम ठरला. आम्हाला आमच्या उत्पादनांबद्दल प्रचंड प्रेम दिसले आणि ऑनलाइन आणि प्रत्यक्ष स्वरूपात आहारप्रेमी ग्राहकांशी थेट संपर्क साधून मौल्यवान माहिती मिळाली.”

 झायडस वेलनेसचे विक्री विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित आहुजा म्हणाले, “फ्लिपकार्ट फूड फेस्ट २०२५ ने आमच्या उत्पादनाची कथा आकर्षक आणि शैक्षणिक स्वरूपात जिवंत करण्यासाठी सर्वात योग्य व्यासपीठ दिले आहे. चर्चासत्रेब्रँड संवाद आणि थेट डेमोद्वारे आम्ही ग्राहकांशी कनेक्ट होऊ शकलो आणि विज्ञानावर आधारित वेलनेस सोल्यूशन्ससाठी आमची वचनबद्धता स्पष्ट करू शकलो. फ्लिपकार्टच्या एकात्मिकप्रभाव निर्माण करण्याच्या क्षमतेमुळे आम्हाला चवकथाकथन आणि नाविन्यपूर्णतेद्वारे आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांच्या नवीन आणि विस्तृत पिढीशी जोडले जाण्यास मदत झाली.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…