Home मनोरंजन लपंडाव मालिकेतून रुपाली भोसलेचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन

लपंडाव मालिकेतून रुपाली भोसलेचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन

1 second read
0
0
70

no images were found

लपंडाव मालिकेतून रुपाली भोसलेचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन

 

स्टार प्रवाहवर नवनव्या मालिकांचा प्रवाह अखंड सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच भेटीला आलेली हळद रुसली कुंकू हसलं मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतानाच आता लपंडाव ही नवीकोरी मालिका स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणार आहे. आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले एका छोट्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे. यावेळी संजना नाही तर सरकार बनून ती पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप पाडणार आहे.

या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना रुपाली म्हणाली, ‘लपंडाव मालिकेत तेजस्विनी कामत हे पात्र मी साकारत आहे जिला सगळे आदराने सरकार असं म्हणतात. प्रेम आणि नात्यांपेक्षा तिच्या लेखी पैश्यांना जास्त महत्त्व आहे. घरात आणि ऑफिसमध्येही तेजस्विनीचच राज्य आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका नक्कीच वेगळी आणि आव्हानात्मक आहे. आई कुठे काय करते मालिकेतील मी साकारलेल्या संजना या पात्राला आणि तिच्या लूकला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. तेजस्विनी कामतचाही ग्लॅलमरस अंदाज पाहायला मिळेल. माझ्या लूकवर संपूर्ण टीमने बरीच मेहनत घेतली आहे. मी हे नवं पात्र साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे अशी भावना रुपाली भोसलेने व्यक्त केली. तेव्हा पाहायला विसरु नका लपंडाव लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…