no images were found
‘त्या लाल लेहेंग्यामुळे मला खरोखरीच एका वधूसारखे वाटले-रचना मिस्त्री म्हणाली
झी टीव्हीवरील ‘जागृति – एक नयी सुबह’ या मालिकेतील भावनिक प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. अखेर जागृति (रचना मिस्त्री) आणि सूरज (विजयेन्द्र कुमेरिया) यांनी एकमेकांवरील प्रेमाच्या भावना स्वीकारल्या असून ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशात, गुलाबांच्या सुगंधात आणि सुंदर प्रकाशाने सजवलेल्या स्वप्नवत पार्श्वभूमीवर लग्नाचा हा सीन आहे — हा क्षण त्यांच्या आतापर्यंतच्या प्रेमाच्या आणि भावनात्मक प्रवासाचा एक निर्णायक टप्पा ठरतो. हा क्षण त्यांच्या नात्याला नवीन वळण तर देतोच, पण आगामी भागांमध्ये आणखी गुंतागुंतीचे नाट्य आणि भावना पाहायला मिळणार असल्याचा संकेतही देतो.
या प्रसंगाला खऱ्या अर्थाने उठाव देणारा भाग म्हणजे रचना मिस्त्रीचा अप्रतिम नववधू लूक! गडद लाल रंगाच्या राजेशाही लेहेंग्यावर सूक्ष्म सोन्याच्या भरजरी नक्षीकामाने सजावट केलेली होती, यात रचना अत्यंत देखण्या आणि तेजस्वी नववधूसारखी भासली. पारंपरिक अशा वधू दागिन्यांनी तिचा लूक पूर्णत्वास गेला — स्टेटमेंट चोकर, पारंपरिक झुमके, मांगटिक्का आणि नथ, यांसोबत मेंदी लावलेले हात आणि तिच्या चेहऱ्यावरचा नववधूचा तेजस्वी आनंद यामुळे तिचे रुप पाहण्यासारखे होते. या लूकमध्ये परंपरा आणि सौंदर्य यांचा अचूक समतोल साधला गेला होता, ज्यामुळे रचनाचे नववधू रुप प्रेक्षकांसाठी खास ठरले. ही रचना मिस्त्रीची पहिलीच नववधू भूमिका नव्हती, तरी तिने सांगितले की हा लूक तिला खास आणि जवळचा वाटला. भावनांनी भरलेल्या जागृतिच्या प्रवासाशी सुसंगत असा हा गडद लाल लेहेंगा आणि त्यातील खास स्टाइलिंग, यामुळे तिच्या भूमिकेला आणि लूकला एक वेगळीच उंची मिळाली — आणि हे सगळं अनुभवताना रचनालाही अतिशय आनंद झाला.
आपल्या अनुभवाबद्दल रचना मिस्त्री म्हणाली, “आधीही मी ऑनस्क्रीन नववधूचा पोशाख घातला आहे, पण जागृतिच्या रूपात हा लूक खूप वेगळा, अधिक भावनिक, अधिक आपलेपणाचा वाटला. हा गडद लाल लेहेंगा आणि त्यावरील बारकाईने केलेली नक्षी इतकी सुंदर होती की खरंच मी स्वतःला एक खऱ्या अर्थाने दुल्हन असल्यासारखी वाटत होते. खरं सांगायचं तर, जेव्हा मी प्रत्यक्षात लग्न करेन, तेव्हा अशाच प्रकारचं बारकाव्यांनी भरलेलं नववधू रूप मला हवे आहे — तो स्टेटमेंट चोकर, पारंपरिक झुमके, मांगटिक्का आणि नथ, मेंदी लावलेले हात आणि नववधूच्या चेहऱ्यावरचं ते खास तेज — हे सगळं खूपच जादुई वाटलं. या सीनला खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्यामागची भावनिक खोली — जागृति अखेर पूर्ण मनाने प्रेमात पाऊल टाकतेय, आणि तिच्या आनंदातली प्रत्येक भावना मी अनुभवत होते. जागृतिची ही भूमिका साकारताना मला खूप मजा येतेय — ती खंबीर आहे, भावनिक आहे, आणि एकदम खरी वाटते. हा लग्नाचा सीक्वेन्स शूट करणे म्हणजे एक अतिशय सुंदर अनुभव होता, आणि आता प्रेक्षकांनी तो पाहावा यासाठी मी खूप उत्सुक आहे.”
‘जागृति – एक नयी सुबह’ आता प्रेमाच्या एका नव्या टप्प्यावर पोहोचत असताना, प्रेक्षकांना आणखी सखोल भावना, वाढती तणावाची परिस्थिती आणि प्रभावी अभिनय पाहायला मिळणार आहे. आता प्रश्न असा आहे — आकाश (सागर पारेख) जागृतिचा निर्णय स्वीकारेल का? की पुढे अजून काही अडथळे उभे राहतील?