Home आरोग्य टीव्‍ही कलाकारांचे पावसाळ्यामधील स्किनकेअर सिक्रेट्स जाणून घ्‍या

टीव्‍ही कलाकारांचे पावसाळ्यामधील स्किनकेअर सिक्रेट्स जाणून घ्‍या

2 min read
0
0
59

no images were found

टीव्‍ही कलाकारांचे पावसाळ्यामधील स्किनकेअर सिक्रेट्स जाणून घ्‍या

पावसाळा सर्वांचा आवडता ऋतू आहे, पण पावसाळ्यसोबत स्किनकेअरबाबत समस्‍या देखील येतात. वाढणारी आर्द्रता व ओलसरपणामुळे पुरळपासून डिहायड्रेटेड त्‍वचेपर्यंत त्‍वचेच्‍या अनेक समस्‍या निर्माण होऊ शकतात. त्‍वचेला टवटवीत, कोमल व चमकदार ठेवण्‍यासाठी एण्‍ड टीव्‍ही कलाकार पावसाळ्यामधील स्किनकेअर उपायांबाबत त्‍यांचे सर्वोत्तम सिक्रेटस् सांगत आहेत.

मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील नवीन राजेश ऊर्फ गीतांजली मिश्रा म्‍हणाल्‍या, ”माझी त्‍वचा पावसाळ्यादरम्‍यान नेहमीपेक्षा अधिक संवदेनशील बनते. त्‍वचा अधिक तेलकट बनल्‍याने पुरळ, मुरमा, काळे डाग, सफेद डाग दिसतात. या समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी मी घरगुती उपाय म्‍हणून डाळींबाच्‍या बियांपासून बनवलेल्‍या फेस पॅकचा वापर करते, ज्‍यामध्‍ये अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट्स व व्हिटॅमिन सी सारखे वृद्धत्‍वाला विरोध करणारे घटक संपन्‍न प्रमाणात असतात, ज्‍यामुळे निस्‍तेज त्‍वचा पुन्‍हा टवटवीत होते. 

मालिका ‘दूसरी माँ’मधील मनिषा अरोरा ऊर्फ महुआ म्‍हणाल्‍या, ”पावसाळा उत्‍साहाचे वातावरण घेऊन येतो आणि निसर्गाच्‍या सान्निध्‍यात पावसामध्‍ये भिजताना खूप धमाल येते. पण यामुळे त्‍वचेवर देखील परिणाम होतो, म्‍हणून त्‍वचेचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. मी माझ्या त्‍वचेला टवटवीत ठेवण्‍यासाठी आठवड्यातून दोनदा घरगुती स्‍क्रबचा वापर करते. या स्‍क्रबमध्‍ये ओटचे जाडेभरडे पीठ, संत्र्याची साल आणि लाल मसूरची पावडर गुलाब पाण्याच्या मदतीने मिसळते. मी हे स्‍क्रब त्‍वचा अर्धी कोरडी असताना त्‍वचेवर लावते. काही मिनिटांसाठी चेहरा स्‍क्रब करते आणि त्‍यानंतर थंड पाण्‍याने चेहरा स्‍वच्‍छ धुते. यामुळे त्‍वचा तेजस्‍वी होते. मी त्‍वचा चमकदार असण्‍याची इच्‍छा असलेल्‍या सर्व वाचकांना या स्‍क्रबचा वापर करण्‍याची शिफारस करते.

” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील विदिशा श्रीवास्‍तव ऊर्फ अनिता भाबी म्‍हणाल्‍या, ”पावसाळा आपल्‍या त्‍वचेसाठी प्रतिकूल ठरू शकतो. पावसाळ्यादरम्‍यान सर्वत्र ओलावा असल्‍यामुळे त्‍वचा स्‍वच्‍छ व कोमल ठेवणे महत्त्वाचे आहे. याच कारणामुळे मी नियमितपणे माझ्या त्‍वचेची काळजी घेते. मी कोमल व तेजस्‍वी त्‍वचेसाठी दोन चमचे मीठ, एक चमचा लिंबाचा रस आणि काही थेंब ऑलिव्‍ह तेल या मिश्रणासह तयार केलेला साधा, पण गुणकारी फेशियल स्‍क्रब वापरते. मी माझ्या चेहऱ्यावरील अतिरिक्त काजळी आणि तेल काढून टाकण्यासाठी या स्‍क्रबचा वापर करते, ज्‍यामुळे त्‍वचा उत्‍साही व टवटवीत होते.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…