Home आरोग्य  जिल्हा परिषद व जागर फौंडेशनच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न

 जिल्हा परिषद व जागर फौंडेशनच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न

3 second read
0
0
40

no images were found

 जिल्हा परिषद व जागर फौंडेशनच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न

 

कोल्हापूर : कृत्रिमरित्या बाजारात रक्त तयार करता येत नसल्याने जिल्ह्यात पुरेसा रक्तसाठा ठेवण्यासाठी समाजसेवी संस्था, शासकीय व निमशासकीय संस्थानी रक्तदान शिबीरे आयोजित करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले.

जिल्हा परिषद व जागर फौंडेशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर आणाभाऊ साठे व शिक्षणतज्ज्ञ माजी खासदार बाळासाहेब खर्डेकर यांच्या जयंती निमित्त कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये पावसाळ्यात वारंवार उद्भवणारे साथीचे आजार, डेंग्यू सदृष्य साथीमध्ये प्लेटलेट्सचा भासणारा तुटवडा आणि रक्तपेढ्यांमध्ये असणारा अपुरा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीमार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

या रक्तदान शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जवळपास 150 जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. वैद्यकीय तपासणी अंती 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले, यामध्ये आरोग्य विभागातर्गत कु. क. प्रशिक्षण केंद्र कोल्हापूरच्या व आरोग्य विभागातील 40, जिल्हा परिषदेचे इतर विभागातील 13 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमास  माजी आमदार अमल महाडिक, जागर फौंडेशनचे अध्यक्ष बी.जी.मांगले, खर्डेकर फौंडेशनचे अध्यक्ष विक्रमसिंह खर्डेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्ही.टी.पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. एस. डी. रणवीर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी, एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. बाबर, व अन्य प्रमुख  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…