no images were found
युपीएल एसएएसची ओएलएएम अॅग्रीसह भागिदारी, भारतात शाश्वत आणि उत्पादनक्षम ऊस शेतीला चालना देणार
कोल्हापूर – युपीएल सस्टेनेबल अॅग्रीकल्चर सोल्यूशन्स प्रा. लि. (युपीएल एसएएस) ही शाश्वत शेती उत्पादने आणि सुविधांची जागतिक पुरवठादार कंपनी असून त्यांनी ओलाम अॅग्री या खाद्यपदार्थ आणि शेतीव्यसाय पुरवठा क्षेत्रातील कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. देशभरात शाश्वत आणि सातत्यपूर्ण ऊस उत्पादनाला चालना देण्यासाठी शाश्वत मिठास हा उपक्रम या कराराअंतर्गत राबवला जाणार आहे. ओलाम शुगर मिलच्या (छन्नेहट्टी- राजगोळी, कोल्हापूर, महाराष्ट्र) कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती एकर उत्पादनात १५ टक्के वाढ आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्याचे उद्दिष्ट त्यामागे आहे.
या प्रकल्पाने पाण्याचा वापर ३० टक्क्यांनी कमी करण्याचे ठरवले असून त्यासाठी प्रभावी जलसिंचन पद्धतींचा अवलंब केला जाणार आहे. त्याचप्रमाणे खतांचा वापर २५ टक्क्यांनी कमी करून पिक उत्पादन वाढवण्याचे आणि मातीचे आरोग्य सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या भागिदारीच्या मदतीने शेतकऱ्यांना सेवा आणि सुविधांचे सर्वसमावेशक पॅकेज मिळवून दिले जाईल. त्यातील प्रोन्युतिवा पॅकेजचा एक भाग म्हणून युपीएलच्या झेबा या क्लायमेट- स्मार्ट तंत्रज्ञानाचा समावेश केलेला असेल. त्याशिवाय गुड अॅग्रीकल्चर प्रॅक्टिसेसचे (जीएपी) प्रशिक्षण, यांत्रिकीकरण, nurture.farm प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे यांचाही त्यात समावेश असेल. या सुविधा आणि पद्धतींची कार्यक्षमता दर्शवण्यासाठी आतापर्यंत २५ मॉडेल प्लॉट्स तयार करण्यात आले आहेत.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २००० एकरांवर सेवा दिली जाणार असून ७०,००० एकर कार्यक्षेत्राच्या पलीकडे जाण्याची क्षमता त्यात आहे.