Home राजकीय पंचगंगा हॉस्पिटलला शासनाचा कायाकल्प पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने सत्कार.

पंचगंगा हॉस्पिटलला शासनाचा कायाकल्प पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने सत्कार.

24 second read
0
0
101

no images were found

पंचगंगा हॉस्पिटलला शासनाचा कायाकल्प पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने सत्कार.

 

 

 

 कोल्हापूर (प्रतिनिधी):शहरातील पंचगंगा हॉस्पिटलला नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने कायाकल्प योजना अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून याबद्दल शिवसेनेच्या वतीने आज युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते हॉस्पिटल मधील प्रशासन आणि कर्मचारी यांचा मानाचा फेटा, शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला. 

       पंचगंगा हॉस्पिटल येथे पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान हॉस्पिटलच्या अंतर्गत सुधारणांसाठी  आमदार राजेश क्षीरसागर साहेबांच्या वतीने  डीपीडीसीच्या माध्यमातून आणखी 25 लाखाचा निधी मंजूर करून घेऊ, अशी घोषणा यावेळी ऋतुराज क्षीरसागर यांनी केली.

      यावेळी बोलताना श्री ऋतुराज क्षीरसागर यांनी शासनाच्या कायाकल्प योजना प्रकल्प अंतर्गत पुरस्कार प्राप्त पंचांग हॉस्पिटलच्या कामाचे कौतुक करून या ठिकाणी  देण्यात येणाऱ्या सुविधा माहिती आणि स्टाफ च काम याची प्रशंसा केली. भविष्यात देखील अशाप्रकारे सुविधा हॉस्पिटलकडून देण्यात याव्यात, तसेच शासन स्तरावर कसलीही गरज असल्यास आम्ही सदैव मदतीसाठी तत्पर आहोत, अशी ग्वाही दिली.

      यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे,आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी मनोगत व्यक्त केले.यानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त हॉस्पिटल मधील  गरोदर मातांना डिंक लाडू चे वाटप करण्यात आले.

        सूत्रसंचलन सौरभ कुलकर्णी यांनी तर आभार रियाज बागवान यांनी मानले. यावेळी सनी अतिग्रे, उमेश जाधव, सूरज धनवडे, अनंत पाटील, किरण मांगूरे, अक्षय ओतारी, अक्षय धनवडे, शिरीष गवळी, जयराज ओतारी, सौ.यशश्री घाटगे, सौ.दिपाली अतिग्रे, प्रणोती पाटील सई पाटील, रोहन शिंदे यांच्यासह हॉस्पिटल स्टाफ, भागातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई कोल्हापूर  : शहरातील राजेंद…