
no images were found
टेलिव्हिजन सेलिब्रिटींचा गणेशोत्सव
गणेशोत्सव जवळच आला आहे, अनेक गणेशभक्तांप्रमाणे एण्ड टीव्ही कलाकार देखील हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत. ते त्यांच्या घरांमध्ये बाप्पाचे आगमन करण्याची तयारी करत आहे. घराची साफसफाई, सजावट आणि मोदक करण्यासह लगबग सुरू झाली आहे. हे कलाकार आहेत आयुध भानुशाली (कृष्णा, ‘दूसरी माँ), गीतांजली मिश्रा (राजेश, हप्पू की उलटन पलटन) आणि रोहिताश्व गौड (मनमोहन तिवारी, ‘भाबीजी घर पर है‘). मालिका ‘दूसरी माँ‘मधील आयुध भानुशाली ऊर्फ कृष्णा म्हणाला, ”गणेशोत्सव माझा सर्वात आवडता सण आहे आणि आम्ही गणपती बाप्पाचे आगमन करण्यापूर्वी मी तयारी करण्याचा छान आनंद घेतो.
दरवर्षी माझ्या इमारतीमध्ये आम्ही उत्साहात व जल्लोषात गणेशोत्सव सण साजरा करतो. आम्ही यंदा गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तयारी सुरू केली आहे. मी जयपूरमध्ये असलो तरी सतत माझ्या मित्रांच्या संपर्कात राहत गणेशोत्सवादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांबाबत जाणून घेत आहे. मी बाप्पाच्या आगमनापूर्वी घरी परतणार आहे आणि ढोल-ताशांच्या तालावर नृत्य करत बाप्पाचे आगमन करणार आहे. सध्या मी मंडळामध्ये दर सायंकाळी बाप्पाची आरती झाल्यानंतर खेळणारे विविध गेम्स व खास दिवसांबाबत नियोजन करत आहे. कार्यक्रमामध्ये नृत्य, वेशभूषा, अंताक्षरी नाइट आणि सांस्कृतिक खाद्यपदार्थ मेळावा यांचा समावेश आहे. मी हा सण सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे, कारण मला स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळतो. गणपती बाप्पा कोणतीही मागणी करत नसला तरी मी बाप्पासाठी प्रसाद तयार करणाऱ्या सर्व काकूंकडून स्वादिष्ट पदार्थ मागत राहणार आहे, जेणेकरुन मी त्याचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकेन (हसतो).”