no images were found
‘कथ्थक आदी कथ्थक’ डॉक्युमेंन्ट्रीचे शुक्रवारी शिवाजी विद्यापीठात स्क्रिनिंग
कोल्हापूर🙁 प्रतिनिधी) शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 15 रोजी पुणे येथील रेवा रावत दिग्दर्शित ‘कथ्थक आदी कथ्थक’ या डॉक्युमेंन्ट्रीचे स्क्रीनिंग होणार आहे. नाट्यशास्त्र विभागातील हॉलमध्ये दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम होईल.
कथ्थक मूर्तीशिल्पांचा नाट्यशास्त्राशी कसा संबंध आहे, याचा उलगडा या डॉक्युमेंट्रीमध्ये केला आहे. इतिहासाच्या दृष्टीनेही याचे विशेष महत्व आहे. नृत्य आणि शिल्पकलेवर आधारित असलेली ही डॉक्युमेंन्ट्री 90 मिनिटांची आहे. डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी सर्वांना निःशुल्क प्रवेश असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संगीत आणि नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अंजली निगवेकर आणि पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.