no images were found
एचएसबीसी म्युच्युअल फंड्स सादर करत आहे फायदे वाली आदत
एचएसबीसी म्युच्युअल फंड्सने एसआयपी आहे फायदे वाली आदत ची सुरुवात केली आहे. ह्या डिजिटल, गुंतवणूक प्रशिक्षण कँपेनमध्ये दीर्घकालीन आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी एसआयपीचे महत्त्व सांगितले जाईल. अशा प्रकारची ही पहिली मोहीम आहे, ज्यात भारताच्या 27 आणि 35 दरम्यान वय असलेल्या मिलेनियल गुंतवणूकदारांना प्रशिक्षण दिल जाईल आणि सक्षम बनविले जाईल.
भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगात नवीन गुंतवणूकदारांचा उल्लेखनीय ओघ दिसून आला आहे, त्यापैकी एक मोठा हिस्सा मिलेनियल्सचा आहे. इंडस्ट्रीच्या अहवालात असे दिसून आले की आर्थिक वर्ष 2019-23 दरम्यान 54% नवीन गुंतवणूकदारांनी (अंदाजे 85 लाख) गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू केली, जे सर्व मिलेनियल्स आहेत (मे 2023, सीएएमएस अहवालानुसार). एसआयपी आहे फायदे वाली आदत कँपेनमधून या गटावर लक्ष्य केंद्रीत केले जाईल त्यांच्या आकांक्षा आणि आर्थिक उद्दिष्टांना त्यांच्या स्वतःच्या पिढीच्या भाषेत संबोधित करेल. जेणेकरून तेही भविष्यकाळासाठी चांगला निधी उभा करू शकतील. एसआयपी मिलेनियल्सना सातत्याने गुंतवणूक करण्याची संधी देते, अगदी वेगवेगळ्या उत्पन्नाच्या पातळीवरही. मोहिमेचा व्हिडिओ चक्रवाढीच्या सामर्थ्यावर आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या महत्त्वावर भर देतो. हा मिलेनियल्स लोकांना त्यांच्या विविध आर्थिक ध्येयांची पूर्तता करण्यासाठी, त्यांच्या गुंतवणूक प्रवासाला लवकर सुरू करण्यास प्रोत्साहित करतो.
कँपेनमध्ये जीवनातील खऱ्या परिस्थितीचा उपयोग करून हे दाखवले आहे की आत्ता छोटी पाऊले टाकून पुढे खूप महत्त्वपूर्ण टप्पे गाठता येऊ शकतात. दीर्घ कालावधीत एसआयपी आर्थिक विपुलता साधते. केवळ संयम, सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच तुमची स्वप्ने पूर्ण होण्यास मदत होते, एका वेळी एक शिस्तबद्ध पाऊल. एसआयपी आहे #फायदे वाली आदत मधून मिलेनियल्सना आर्थिक ज्ञानाद्वारे सक्षम बनवलं जाईल. त्यासाठी गुंतवणूक करण्याची शिस्त लावली जाईल आणि मिलेनियल्सना एसआयपीची बहुमोल आर्थिक सवय लावण्याचा प्रयत्न केला जाईल. ह्या कँपेनमधून चांगली माहिती असलेली आणि आत्मविश्वासू गुंतवणूकदार पिढी घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. ह्यात तीन छोट्या फिल्म्स आहेत. प्रत्येक फिल्ममध्ये खऱ्या जीवनातील घटनांमधून, महत्त्वाकांक्षा आणि मिलेनियल्सची खर्च करण्याची अनोखी सवय दाखवली गेली आहे. एसआयपी आहे #फायदे वाली आदत कँपेनमधून एसआयपीद्वारे आर्थिक विवेकाचं महत्त्व पटवलं जाईल. ह्या सीरिजची पहिली फिल्म आज सादर होईल, बाकीच्या फिल्म्स पुढील 2 आठवड्यांमध्ये सादर होतील.
तुम्ही डिजिटल फिल्म इथे पाहू शकता: https://youtu.be/5P7qo8_y46I
एचएसबीसी म्युच्युअल फंड, एसआयपी आहे फायदे वाली आदत कँपेनमधून सर्व डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लाभ घेत आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये कंपनी मिलेनियल्स ग्राहकांना डिस्प्ले, बॅनर अॅड, सर्च मार्केटिंग, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, इंस्टाग्राम, फेसबुक, एक्स (आधीचं ट्विटर), लिंक्डइन आणि यू ट्यूबमध्ये एंगेज करणार आहे. त्यासोबत, एचएसबीसी म्युच्युअल फंड एसआयपी आहे फायदे वाली आदत अँथेम तयार करत आहे, ज्यात सिग्नेचर डान्स स्टेप असतील. ज्यामुळे मिलेनियल्स एंगेज होतील.सर्व प्रशिक्षणात्मक स्रोतांसाठी आणि एसआयपीच्या अधिक माहितीसाठी, आणि आकर्षक काँटेस्ट व इवेंट्समध्ये सहभागी होण्यासाठी गुंतवणूकदार www.assetmanagement.hsbc.co.in/en/siphaifaydewaliaadat वर भेट देऊ शकतात