Home शासकीय पर्यावरणपूरक गणेशोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे –  संतोष पाटील  

पर्यावरणपूरक गणेशोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे –  संतोष पाटील  

3 second read
0
0
25

no images were found

पर्यावरणपूरक गणेशोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे –  संतोष पाटील
 

कोल्हापूर  : यावर्षीच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये जिल्ह्यातील सर्व कुटुंबांना सहभागी होण्यासाठी व धार्मिक भावना न दुखावता नदी प्रदुषण रोखण्याकरिता आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याबाबत सर्व ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव- 2023 उपक्रमामध्ये आपला जिल्हा महाराष्ट्र व देशात अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी योगदान देवून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमासाठी जिल्हा परिषद सज्ज झाली असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या उपक्रमात जास्तीत जास्त कुटुंबांना सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त कुटुंबांचा सहभाग घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंचांना
आवाहन केले आहे.
जिल्ह्यात सन 2015 पासून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सन 2015 ते 2022 या आठ वर्षामध्ये या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे हे आठवे वर्ष असल्याने हा उपक्रम आणखी प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी वाढली असल्याने यावर्षी देखील अत्यंत
नियोजनबध्द पध्दतीने हा उपक्रम यशस्वी करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील नदी, तलाव, पिण्याच्या पाण्याच्या विहीरी इत्यादी सार्वजनिक जलस्त्रोतांचे प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.
गावामध्ये  एक गाव, एक गणपती या संकल्पनेनुसार सार्वजनिक गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करणे, घरगुती गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करताना धातुच्या, संगमरवरी, इतर पर्यायी किंवा मातीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करणे, तसेच घरगुती गणेशमुर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करणे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन
स्थळी (कृत्रिम तलाव/कुंड) विसर्जन करण्याबाबत गाव स्तरावर प्रबोधन करणे. तसेच गावनिहाय मुर्ती संकलन व पर्यायी विसर्जनासाठी ठिकाणे निश्चित करुन त्याबाबत गाव स्तरावर प्रसिध्दी करणे. निश्चित केलेल्या ठिकाणांची स्वच्छता करणे.
मुर्ती विसर्जनाकरिता आवश्यक काहीली संख्या किंवा वापरात नसलेल्या पाण्याच्या खणी निश्चित करुन, फेरविसर्जनासाठी दिलेल्या मुर्ती शक्य असल्यास सर्वांच्या अनुमतीने मुर्ती कुंभाराकडे परत देण्याबाबतचे नियोजन करणे. यासाठी गावस्तरावर कुंभारांच्या नावांची यादी उपलब्ध करुन देणे. निर्माल्य संकलनासाठी ठिकाणे निश्चित करणे,
निर्माल्य जमा झाल्यानंतर त्याची वाहतूक व्यवस्था व त्याच्या सुयोग्य व्यवस्थापनाकरिता जागेची निश्चिती करणे. निर्माल्यातून येणारे प्लॅस्टीक वेगळे केले जाईल. यासाठी घरातून निर्माल्याचे वर्गीकरण केले जाईल. याबाबत आशा, अंगणवाडी सेविका, शालेय विद्यार्थी यांच्यामार्फत जनजागृती करणे अशा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचे सनियंत्रण करण्यासाठी तालुकास्तरावरुन प्रत्येक गावासाठी संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच जिल्हा स्तरावरुन या उपक्रमाचे सनियंत्रण केले जाणार आहे. घरगुती गणेश विसर्जनादिवशी जिल्हा परिषद, कोल्हापूर व उपप्रादेशिक कार्यालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर यांच्या पथकाव्दारे गावामध्ये केलेल्या नियोजनाच्या पाहणीसाठी भेटी दिल्या जाणार आहेत.
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी जिल्ह्यात एकूण 1 हजार 122 जुन्या विहीरी, खणी निश्चित करण्यात आल्या आहेत. तर एकूण 977 इतक्या पर्यायी व्यवस्थांची (काहिली, कृत्रिम तलाव, मोठी भांडी ) निर्मिती करण्यात आली आहे. तसेच मुर्ती परत घेण्यासाठी 300 इतके कुंभार आहेत. निर्माल्य संकलनासाठी 1 हजार 321 ट्रॉली व 188 घंटागाडी ठेवण्यात आल्या असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…