
no images were found
वसंतदादा पाटील यांची नात डॉ.मधु पाटील यांचे निधन; अंत्यसंस्कार आज
माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची बहीण डॉ. मधु पाटील यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. वसंतदादा पाटील यांच्या त्या नात होत्या.
सांगली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात डॉ. मधु प्रकाश पाटील यांचे निधन झाले. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची त्या बहीण होत्या. शुक्रवारी रात्री ९ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ४४ वर्षाच्या होत्या. मधु पाटील या राजकीय घराण्यात होत्या. त्यांच्या आई-आणि वडील हे देखील राजकारणात होत्या. वडील प्रकाशबापू पाटील खासदार होते. तर आई देखील काँग्रेस पक्षात सक्रीय होत्या. शुक्रवारी रात्री मधु पाटील यांना हृदयविकाराच्या धक्का बसला, त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रात्री ९ वाजता त्यांचे निधन झाले. त्याच्या पार्थिवावर आज शनिवारी (१३ ऑगस्ट) दुपारी एक वाजता पद्याळे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.