no images were found
प्रत्येक मंत्र्याला मिळणार 2-3 खाती; पण होणार कधी खातेवाटप…
मुंबई : मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण विस्तार होऊन 48 तास झाले तरीही अद्याप खातेवाटप झालेले नाही. विशेष म्हणजे, प्रत्येक मंत्र्यांना प्रत्येकी दोन-तीन खात्यांचे पर्याय विचारण्यात आले आहे. ते पर्याय मंत्र्यांनी त्यांच्या पक्ष नेतृत्वाला पाठवले देखील आहेत. मात्र अद्याप कोणत्या मंत्र्याला कोणती खाते द्यायची हे अद्याप कळवण्यात आले नाही. कोणते खाते कुणाला दिले जाणार, याबद्दल बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पण, खातेवाटपाचा कोणताही निर्णय झाला नाही. १५ ऑगस्टपूर्वी खाते वाटप झाले तर पालक मंत्री नेमता येईल आणि प्रत्येक जिल्हयात ते ध्वजारोहणासाठी उपस्थित राहू शकतात. त्याच प्रमाणे १७ ऑगस्टपासून राज्य विधीमंडळाच पावसाळी आधिवेशन सुरू होत आहे. आधिवेशनापूर्वी किमान काही दिवसआधी खाते वाटप झाले तर मंत्र्यांना आपल्या विभागाचा आढावा घेता येऊ शकतो. जेणेकरून अधिवेशनात विरोधकांना उत्तर देऊ शकतात. मंत्रिमंडळ विस्ताराला 39 दिवस लागले खाते वाटपeसाठी किती कालावधी लागणारं हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.