no images were found
खोटे आरोप करून सामाजिक शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न करणार्यांवर कारवाई करा – सकल हिंदू समाज
कोल्हापूर – अमरावती येथील सभेत पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी एका धारकर्याला जो मजकूर वाचण्यास सांगितलो तो अमिताव घोष यांनी लिहिलेल्या ‘द कुराण अँड द काफीर’ या पुस्तकातील आहे. असे असतांना यावर जाणीवपूर्वक राजकारण करून काँग्रेस, डावे, पुरोगामी हे अकारण ऋषीतुल्य अशा पू. भिडेगुरुजी यांच्या अटकेची मागणी करून अश्लाघ्य शब्दात त्यांच्यावर टीका करत आहेत. तरी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर जाणीवपूर्वक खोटे आरोप करून सामाजिक शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न करणार्यांवर कारवाई करा, या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे अलसेले निवेदन कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांना देण्यात आले.
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, श्री. विजय गुळवे, कोल्हापूर जिल्हा बजरंग दल संयोजक श्री. पराग फडणीस, श्री. अक्षय ओतारी, श्री. प्रथमेश मोरे, विश्व हिंदु परिषद अध्यक्ष श्री. कुंदन पाटील, सहमंत्री श्री. अनिल दिंडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अशोक रामचंदानी, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, श्री. राजू तोरस्कर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले यांसह धारकरी, तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.