
no images were found
दूरशिक्षण केंद्राच्या वतीने पीएच.डी.प्रवेश परीक्षा कार्यशाळा नावनोंदणी साठी आवाहन
कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्यावतीने ऑनलाइन पीएच.डी.प्रवेश परीक्षा कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती माहिती संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी प्रवेश २०२३-२४ च्या प्रक्रियेसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज दि.१०/०१/२०२४ पर्यंत मागविण्यात आलेले आहेत.याबाबत
पीएच.डी प्रवेश परीक्षा तयारी कार्यशाळा दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी जानेवारी २०२४ मध्ये आयोजित करण्याचा मानस आहे.
यामध्ये ही कार्यशाळा दोन भागात होणार आहे.त्यामध्ये पहिल्या भागात सामान्य ज्ञान व संशोधन पद्धती तसेच दुसऱ्या भागात मराठी,हिंदी,इंग्रजी,राज्यशास्त्र ,अर्थशास्त्र,समाजशास्त्र ,इतिहास,गणित,वाणिज्य ,व्यवस्थापन आदी विषयानुसार मार्गदर्शन केले जाणार आहे.या कार्यशाळेत मान्यवर प्राध्यापक मार्गदर्शन करणार
आहेत. तरी या लिंक द्वारे सहभागी व्हावे, असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी .के.मोरे यांनी केले आहे.