
no images were found
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची नाणेघाट,शिवनेरी गड पदभ्रमंती मोहीम
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २३ व २४ डिसेंबर रोजी नाणेघाट, जीवधन, चावंड,शिवनेरी गड ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. डी.वाय.पी.सी.ई.टी अडव्हेंचर क्लबच्या सहकायनि आयोजित करण्यात आलेल्या या ट्रेकमध्ये ३० विद्यार्थिनी व ४४ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नाणेघाट,जीवधन,चावंड,शिवनेरी गडांचा इतिहास, निसर्ग सोंदर्य,जीवसृष्टी ची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली व तसेच जीवधन व चावंड गडांवरती स्वच्छता मोहीमही राबवली.
सुमारे १८ किलोमीटरचा हा ट्रेक विद्याच्यांनी पूर्ण केला, पी 2 पी ट्रेकर्सचे अमित कोष्टी (इचलकरंजी) यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. अॅडव्हेंचर क्लब व राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा. योगेश चौगुले, सुदर्शन साळोखे,योगेश कुंभार आणि विनायक लांडगे हे उपस्थित होते. हा ट्रेक यशस्वी करण्यासाठी संकेत घाटगे, गौरव चौगले, अथर्व गगाने, तनिषा मदाने, पल्लवी पाटील श्रेया वाघ,अथर्व ढेरे विद्यार्थी समन्वयकांनी मेहनत घेतली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील,पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, डीन स्टुडंट अफेअर डॉ.राहुल पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.