
no images were found
शिवाजी विद्यापीठात बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग जयंती
कोल्हापूर(प्रतिनिधी) – वीर बाल दिवसानिमित्त बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी या वीर बाल यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली. श्री गुरू गोविंद सिंग यांचे पुत्र बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिन म्हणून साजरा केला जातो. वीर बाल यांच्या प्रतिमेस आज कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, बॅ.बाळासाहेब ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ.धनंजय सुतार, डॉ.प्रदीप गुरव, डॉ.पंकज पवार, डॉ.पद्मा दांडगे, डॉ.संदीप काळे, श्रीमती सीमा बुवा, राजेंद्र बारड, अनिल पोवार यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक मोठया संख्येने उपस्थित होते.