Home मनोरंजन वंशज’ मालिकेत युक्ती मुल्तानीची रहस्यमय एंट्री

वंशज’ मालिकेत युक्ती मुल्तानीची रहस्यमय एंट्री

4 second read
0
0
39

no images were found

वंशज’ मालिकेत युक्ती मुल्तानीची रहस्यमय एंट्री

 

सोनी सबवरील ‘वंशज’ मालिका पुरुषांचे वर्चस्व असलेल्या महाजन साम्राज्यात येणाऱ्या अडचणींतून मार्ग काढणाऱ्या युविकाच्या (अंजली तत्रारी) हिच्याभोवती फिरते. व्यवसायावर नियंत्रण मिळवण्यावरून या कुटुंबातील सदस्य एकमेकांशी भयंकरपणे झुंजत असतात. ही मालिका दृढनिश्चयी युविकाची (अंजली तत्रारी) कथा सांगते. डीजेच्या (माहीर पांधी) सततच्या कट-कारस्थानांविरुद्ध ती खंबीर राहते. एकमेकांविरुद्धच्या या संघर्षाला भयंकर वळण लागते जेव्हा डीजने लावलेल्या आगीत युविका सापडते. 

मालिकेतील आगामी भाग महत्त्वाचा टर्निंग पॉइंट दाखवणार असून त्यानुसार मालिकेत एका वर्षाचे स्थित्यंतर घडते, यातून वंशजमध्ये एका नव्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. डीजे आपली सर्वात मोठी स्पर्धक युविकाला संपवल्याचा आनंद  साजरा करत असताना युविकाची आई भूमी (गुरदीप कोहली) आपल्या मुलीला गमावल्याच्या दु:ख सहन करू शकत नसल्याचे दिसते. यातून ती हळूहळू मानसिक तणावाच्या दिशने जात असते. युविकाच्या गैरहजेरीत एक आश्चर्यजनक कलाटणी प्रेक्षकांची वाट पाहत आहे. युविकाला कुणीतरी वाचवले असावे, असे सूचित करणारा एक आशेचा किरण लकाकतो. अशात युक्ती नावाचे एक रहस्यमय पात्राची मालिकेत एंट्री झाल्याने ही अपेक्षा आणखीच वाढते. युक्ती ही दिसायला युविकासारखीच असते. ती धनाढ्य आणि संपन्न मुल्तानी कुटुंबाची भाची असते. युक्तीची उपस्थिती डीजेच्या आयुष्यात गेम चेंजर म्हणून सिद्ध होईल का, हे पाहणे अद्याप बाकी आहे. 

मालिकेत युविकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंजली तत्रारी म्हणाली की, “दिसण्यापासून ते बोलण्याच्या रितीपर्यंत युक्ती ही युविकापेक्षा अगदीच वेगळी आहे. महाजन परिवाराच्या घडमोडींत युक्ती ही महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज झालेली आहे. यामुळे मालिकेला एक कलाटणीदेखील मिळणार आहे. हे एक उत्कंठावर्धक परिवर्तन असून कथानकात खूपसारे रहस्य निर्माण करणारे आहे. युक्तीचा अचानक झालेला प्रवेश आणि त्यातून ती वंशजमध्ये काय घडामोडी घडवून आणते, हे प्रेक्षकांनी अनुभवण्यासाठी मी देखील खूप आतूर झाले आहे. 

Load More Related Articles

Check Also

नवउद्योजकांना दुबईत उत्पादने निर्यातीसाठी मार्गदर्शन करणार : धनंजय दातार

नवउद्योजकांना दुबईत उत्पादने निर्यातीसाठी मार्गदर्शन करणार : धनंजय दातार    &nbs…