Home शैक्षणिक एनआयटीचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

एनआयटीचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

2 second read
0
0
33

no images were found

 

एनआयटीचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):- श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला. देशविदेशात कार्यरत असणारे हजारो माजी विद्यार्थी हे न्यू पॉलिटेक्निक तथा न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीचे वैभव आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘प्रिन्स शिवाजी’चे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी केले. विविध क्षेत्रात नोकरी व्यवसाय करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना जोडणारे ऑनलाईन व्यासपीठ ‘न्यूपोलियन्स फोरम’ चे उद्घाटन यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. हे फोरम एआय आधारित असून माजी विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक गरजा एकमेकांमधून पुरवण्यासोबतच सद्ध्याच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान व नोकरी व्यवसाय सुरू करण्यास पाठबळ मिळावे हा या फोरमचा उद्देश असल्याचे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी सांगितले. डाॅ. अभिजीत देसाई, रविकिशोर माने, इंद्रजित मोहिते-पाटील, अतुल जगताप, अजय पवार यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी न्यू पॉलिटेक्निक हा आमचा पाया तर एनआयटी हे भविष्य असेल आणि आम्ही आज जे काही आहोत ते निव्वळ न्यू पॉलिटेक्निकमुळेच अशा शब्दांत काॅलेजविषयी कृतज्ञता व्यक्त केली. काॅलेजमधील नवीनतम कोर्सेस, आयआयसी व स्कील हब यांचे कामकाज, अद्ययावत सुविधा, सुशोभित परिसर पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रास्ताविक अधिष्ठाता डाॅ. नितीन पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी केले. यावेळी मेळावा समन्वयक प्रा. सुभाष यादव, टिपीओ प्रा. किरण वळीवडे, विभागप्रमुख, स्टाफ यांच्यासह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Load More Related Articles

Check Also

भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने भाजपा स्थापना दिन उत्साहात संपन्न

भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने भाजपा स्थापना दिन उत्साहात संपन्न use    …