no images were found
सुमीत इंडस्ट्रीज मोठी घोषणा! 199.75 कोटींचा राइट्स इश्यू; कर्जफेड आणि सौर प्रकल्पासाठी निधी उभारणार
सुरत : एकात्मिक पॉलिस्टर उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी सुमीत इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या व्यवसाय विस्तार आणि आर्थिक बळकटीसाठी 199.75 कोटींच्या इश्यूची घोषणा केली आहे. कंपनीने पात्र भागधारकांसाठी हा इश्यू आणला असून त्यातून उभारण्यात येणारा निधी उत्पादन क्षमता वाढ, कर्ज कमी करणे, कार्यकारी भांडवल मजबूत करणे आणि सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाने 16.84 कोटी पूर्णतः भरलेल्या इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून 199.75 कोटी उभारण्यास मंजुरी दिली आहे. या इश्यूद्वारे कंपनीची आर्थिक लवचिकता वाढविणे आणि दीर्घकालीन वाढीच्या योजनांना गती देणे हा मुख्य उद्देश आहे.
राइट्स इश्यूचे प्रमुख तपशील
-इश्यूचा आकार- 199.75 कोटी रुपये,
-ऑफर केलेले शेअर्स- 16.84 कोटी इक्विटी
-इश्यू किंमत- 11.86 रुपये प्रति शेअर
-दर्शनी मूल्य- 2 रुपये प्रति शेअर
-हक्क प्रमाण- प्रत्येक 25 शेअर्समागे 8 राइट्स शेअर्स
-रेकॉर्ड डेट- 12 जून 2026
-इश्यू सुरू- 22 जून 2026
हक्क हस्तांतरणाची अंतिम तारीख-15 जुलै 2026
-इश्यू बंद- 20 जुलै 2026
1.40 लाख टन क्षमतेच्या नवीन प्लांटसाठी 49 कोटी रुपये*
राइट्स इश्यूमधून मिळणाऱ्या निधीपैकी 49 रुपये कोटींचा वापर नकोडा लिमिटेडकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या 1,40,000 टन प्रति वर्ष क्षमतेच्या पॉलिस्टर चिप्स प्लांटच्या कार्यान्वयनासाठी करण्यात येणार आहे.
सुरत, गुजरात येथे असलेल्या या प्रकल्पासाठी एकूण 90 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून उर्वरित 41 कोटी रुपये कंपनी अंतर्गत स्त्रोतांमधून उभारणार आहे. हा प्रकल्प आर्थिक वर्ष 2027-28 च्या पहिल्या तिमाहीत सुरू होण्याची अपेक्षा असून त्यामुळे कंपनीचे बॅकवर्ड इंटिग्रेशन अधिक मजबूत होईल आणि पॉलिस्टर उत्पादन व्यवसायाला चालना मिळेल.