Home Uncategorized पशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादन कार्यक्रम

पशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादन कार्यक्रम

1 second read
0
0
9

no images were found

पशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादन कार्यक्रम

कोल्हापूर,  : राज्यात मान्सून 2026 वर एल निनो या हवामान घटकाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन पशुधनाचे संरक्षण तसेच संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 अंतर्गत चारा उत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

पशुपालकांनी उपलब्ध जमिनीवर जास्तीत जास्त हिरवा चारा लागवड करावी, चारा साठवणुकीवर भर द्यावा तसेच मुरघास निर्मितीचा अवलंब करावा. शेतकरी व पशुपालकांना सकस हिरवा चारा उपलब्ध व्हावा या हेतूने 100 टक्के अनुदानावर सुधारित वैरण बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेत वैरण बियाणे मागणी अर्ज लवकरात लवकर करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

विद्यार्थीसंख्या वाढीसाठी गुणवत्ता आणि विश्वासार्हता आवश्यक : डॉ. विलास शिंदे

विद्यार्थीसंख्या वाढीसाठी गुणवत्ता आणि विश्वासार्हता आवश्यक : डॉ. विलास शिंदे कोल्हापूर : …