
no images were found
‘एनआयटी’ मध्ये ऊर्जा संवर्धन कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर ( प्रतिनिधी):-श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) मधील इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी), टेक्निकल क्लब व इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनियरिंग (पदवी विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवसानिमित्त (१४ डिसेंबर) ऊर्जा संवर्धन या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. सरकारी परवानाधारक विद्युत कंत्राटदार भगवती इलेक्ट्रिकल्सचे संचालक किरण घुमे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवाश्म इंधन वापराचे दुष्परिणाम, उर्जा संवर्धन कायद्यानुसार स्थापित उर्जा कार्यक्षमता ब्युरो (BEE) चे कार्य व मानके, विद्युत वाहने, सौर नागरी वास्तुकला, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट ग्रिड, उर्जा लेखापरिक्षण, सौर व पवन ऊर्जेतील आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुषंगिक व्यावसायिक संधी याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. घरातील उर्जा बचतीच्या क्लुप्त्या सांगत सौर बंब, सौर कुकर, सौर विद्युत उपकरणे वापरण्याची उपस्थितांना सूचना केली. प्रास्ताविक व तज्ञांचा परिचय इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. बाजीराव राजिगरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. निलम कोन्नूर यांनी केले. कार्यशाळेसाठी अनिकेत तिबिले यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेस संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील व प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांचे प्रोत्साहन लाभले. यावेळी आयआयसी अध्यक्ष प्रा. अश्विनकुमार व्हरांबळे, उपाध्यक्ष प्रा. संग्रामसिंह पाटील, प्रा. सुहासचंद्र देशमुख, प्रा. प्रवीण जाधव, स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.