हवामान बदलाचा पावसावरील परिणामाचा सखोल अभ्यास आवश्यक: डॉ. हामझा वरिकोडण कोल्हापूर,: हवामान बदल आणि त्याचा पावसावर होणारा परिणाम याचा सखोल अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM) येथील तज्ज्ञ डॉ. हामझा वरिकोडण यांनी व्यक्त केले. गेल्या काही वर्षांत हवामान बदलामुळे अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका शेतकरी, नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला बसत आहे. …