Home कौटुंबिक नैसर्गिक आझाद हिंद नेचर आर्मी च्या पर्यावरण चळवळीला एन सी सी ताकद देईल …कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित

आझाद हिंद नेचर आर्मी च्या पर्यावरण चळवळीला एन सी सी ताकद देईल …कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित

12 second read
0
0
77

no images were found

आझाद हिंद नेचर आर्मी च्या पर्यावरण चळवळीला एन सी सी ताकद देईल …कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित

कोल्हापूर ( प्रतिनिधी ): आझाद हिंद नेचर आर्मीच्या “कोल्हापूरचा पारा ४१@३६ करणार” या पर्यावरण चळवळीला पाच महाराष्ट्र बटालियन ताकद देईल, पाच महाराष्ट्र बटालियनचे सर्व एनसीसी विद्यार्थी वर्षभरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सज्ज राहतील असे प्रतिपादन पाच महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित यांनी केले.

    ते आझाद हिंद नेचर आर्मी कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर ग्रुप एनसीसी भवन येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदूम होते.

     यावेळी पाच महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित, कर्नल सुहास काळे ,कोल्हापूर एनसीसी ग्रुपचे ट्रेनिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई, आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदूम यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

  कर्नल दीक्षित पुढे म्हणाले, तापमान वाढ रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे.प्रत्येक भारतीयाने खारीचा वाटा उचलून काम करावे.यामधून जगाला पर्यावरण विषयी चांगला संदेश आपण देवू शकतो.

कोल्हापूर एनसीसी ग्रुपचे ट्रेनिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई म्हणाले, प्रत्येकाने दररोजच्या वापरात प्लास्टिक टाळून प्रदूषण दूर करावे.आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य करावा.

      यावेळी कार्यक्रमास एनसीसीचे प्रशासन ट्रेनिंग जेसीओ सुभेदार मेजर सुरेंद्र भोसले, आझाद हिंद नेचर आर्मीचे, अमर भोसले, परितोष उरकुडे, निलेश नाडगोंडा, शिवाजी विद्यापीठचे उद्यान अधीक्षक अभिजीत जाधव, एनसीसीचे सुभेदार सचिन पाटील, सुभेदार राजाराम आढाव, जीसीआय अपूर्वा शेलार एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा,फर्स्ट ऑफिसर अँथनी डिसोजा, फर्स्ट ऑफिसर अनील सकरे,थर्ड ऑफिसर विजय शहापुरे, थर्ड ऑफिसर शंकर महाले बटालियनचा पीआय स्टाफ यांच्यासह एनसीसी विद्यार्थी, कार्यालयीन स्टाफ आदी उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In नैसर्गिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…