Home कौटुंबिक नैसर्गिक न्यू कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने वृक्षारोपण.   

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने वृक्षारोपण.   

1 min read
0
0
101

no images were found

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने वृक्षारोपण.                                                                                     कोल्हापूर (प्रतिनिधी):श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, न्यू कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने  शनिवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२५ रोजी वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन पिशवीकर यांच्या पुढाकाराने व त्यांचा मार्गदर्शनाखाली हे वृक्षारोपण करण्यात आले.

       या वृक्षारोपानासाठी एच. डी. एफ. सी.(होलसेल बँकिंग ओपेरेशन) कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत यांच्याकडून १०० वृक्ष महाविद्यालायला देण्यात आली होती. एच. डी. एफ. सी चे मनेजर श्री. अनिल माने म्हणाले कि वृक्षारोपण केवळ पर्यावरणासाठी नव्हे तर मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. म्हणूनच प्रत्येकाने झाडे लावावी, त्यांचे संगोपन करावे आणि पर्यावरण रक्षणात आपला हातभार लावावा हा संदेश दिला.  

     महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन पिशवीकर यांनी एच. डी. एफ. सी बँकेतील उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार मानत दिलेल्या वृक्षांची योग्य निगा व संगोपन करण्यात येईल याची ग्वाही दिली.                   

      या  कार्यक्रमासाठी श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस चे चेअरमन डॉ. के. जी. पाटील तसेच संचालिका सौ. सविता पाटील मॉडम , विकास अधिकारी डॉ. संजय दाभोळे उपस्थित होते.

           यावेळेस एच.डी.एफ.सी.(होलसेल बँकिंग ओपेरेशन) चे सर्कल हेड आशिष भागवत, क्लस्टर हेड किरण नाईक, युनिट हेड अझरूद्दीन शेख, व मनेजर अनिल माने उपस्थित होत्ते. प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होतेया कार्यक्रमासाठी प्राध्यापक राजेश कुलकर्णी यांनी अथक परिश्रम घेतले.

 

  

               

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In नैसर्गिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…